मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे "मराठा सामाजिक संस्थेच्या" वतीने मराठा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
'विषय गंभीर तिथे मराठा खंबीर' या उक्तीप्रमाणे मराठा समाजानेही जुन्या चालीरीती संस्कृती परंपरेत न अडकता गुजराती मारवाडी सिंधी लोकांप्रमाणे उद्योगात यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी "रिस्क" ही घेतलीच पाहिजे. शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते तसेच आता त्यांचीच विचारधारा पुढे चालवत उद्योगक्षेत्रात जिद्दीनं उभे राहणे गरजेचे आहे. 
मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव सुर्वे, उपाध्यक्ष सुहास तावडे, कार्यवाहक संदीप भोसले, अश्विनीताई भोसले, कैलास येरुणकर, साक्षीताई घोसाळकर, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कदम यांनी नवउद्योग करणाऱ्यांना वेगवेगळे "बिझनेस माॅडेल" चे सादरीकरण करून संस्थेच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच सचिव विनायक सुर्वे, पदाधिकारी संदीप कदम, विजय सावंत, विजय मोहिते, सतिश भोसले, हनमंत माने, रवि कदम, शंतनु पवार, सविता पाटील आणि दिव्या विचारे या सर्वांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले.
सुहास तावडे, भास्करराव सुर्वे, संदीप भोसले, अनिल कदम, अश्विनीताई भोसले, साक्षीताई घोसाळकर यानी मोलाचं मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहनही केले.
Attachments area

रिपोर्टर

संबंधित पोस्ट