मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

टाटा आयपीएल - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा  आजचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्याच वानखेडे स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला सामना राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्सने ३ धावांनी जिंकला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्स चॅलेंजर्सकडून खेळाची सुरूवात करायला जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल उतरले. दोघांनीही सतत धावा काढत धावफलक हलता ठेवला. आवेश खानने जोस बटलरचा १३ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. कर्णधार संजू सॅमसनही हळूहळू धावा जमवत होता पण जेसन होल्डरने त्याला १३ धावांवर पायचीत टिपले. देवदत्त पडीक्कलला कृष्णाप्पा गौथमने २९ धावांवर बाद केले. त्याच षटकात आर. दुस्सेनला कृष्णाप्पा गौथमने झटपट बाद केले. इतक्यात शिमरॉन हेटमेअर नावाचं वादळ मैदानावर धडकलं. रवीचंद्रन आश्विनच्या जोडीने त्याने धावसंख्या फुगवली. २८ धावांवर खेळत असताना आश्विन दुखापतीमुळे बाहेर गेला. रियान परागला जेसन होल्डरने झटपट बाद केले. ट्रेंण्ट बोल्टने बिनबाद २ तर हेटमेअरने एक चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३६ चेंडूंत बिनबाद ५९ धावा काढल्या. राजस्थानने २०व्या षटकाच्या अखेरीस १६५/६ जमा केल्या.
लखनौ सुपर जायंट्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार के. एल. राहुल आणि क्विंटन डिकॉक उतरले. ट्रेंण्ट बोल्टने पहिल्याच चेंडूवर राहुलचा त्रिफाळा उध्वस्त केला. त्याच्याजागी आलेल्या कृष्णाप्पा गौथमला लगचेच पायचीत टिपले. जेसन होल्डरने झटपट दोन चौकार मारले. प्रसिद्ध कृष्णाने त्याला बाद केले. डिकॉक आणि दीपक हुडा डावाला आकार देण्याचा प्रयत्न करू लागले. पण कुलदीप सेनने दीपक हुडाचा २५ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. यझुवेंद्र चहलने आयुष बदोनीला झटपट बाद केले. १२व्या षटकाच्या अखेर लखनौचा अर्धा संघ ७४ धावांवर परतला होता. कृणाल पांड्या वेगाने धावा जमा करू लागला. क्विंटन डिकॉक एक बाजू लावून होता. यझुवेंद्र चहलने डिकॉकला ३९ धावांवर बाद केले आणि त्याच षटकात पांड्यालाही २२ धावांवर परतीचे तिकीट दिले. मार्कस स्टॉईनिशने दुशमंता चमिराच्या जोडीने वेगाने धावा जोडल्या. कोणताही संघ सामना जिंकू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. यझुवेंद्र चहलने चमिराला १३ धावांवर पायचित टिपले. आवेश खानने बिनबाद ७ धावा काढल्या. तर स्टॉईनिशने दोन चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १७ चेंडूंत बिनबाद ३८ धावा काढल्या. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना कुलदीप सेनने टिच्चून मारा करताना केवळ ११ धावा दिल्या. आणि राजस्थानने हा सामना ३ धावांनी जिकला. 
यझुवेंद्र चहलला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत ४१ धावांमध्ये ४ गडी बाद केले होते. 
उद्याचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.  गुजरात सलग ३ सामने जिंकून पूर्ण जोषात आहे तर हैदराबादला दुसर्‍या विजयाचे वेध लागले आहेत.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट