मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गुजरात टायटन्सचा सफाईदार विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर  टाटा आपीएल २०२२ चा दहावा सामना गुजरात टायटन्सने जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गुजरात टायटन्सकडून खेळाची सुरूवात करायला मॅथ्यू वेड आणि शुबमन गील उतरले. मुस्तफिझूर रेहमानने पहिल्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर वेडला बाद केले. ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. विजय शंकरने गीलसह ४२ धावा जोडल्या. कुलदीप यादवने त्याच्या तिन्ही यष्ट्या वाकवल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने गीलला चांगलीच साथ दिली. दोघांनी मिळून ६ धावा संघाच्या खात्यावर लावल्या.  खलील अहमदने पांड्याला रोमेन पॉवेलकडे झेल देण्यास भाग पाडले. डेव्हिड मिलर आणि गील डावाला सुंदर आकार दे असतानाच खलील अहमदने गीलला अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले आणि एक चांगली खेळी संपुष्टात आली. गीलने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ४६ चेंडूंत ८४ धावा काढल्या. राहुल तेवटीयाने झटपट १४ धावा काढल्या. मुस्तफिझूर रेहमानने  त्याला शार्दुल ठाकूरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अभिनव मनोहरदेखील ह्याच षटकात बाद झाला. गुजरातचा संघ १७१/६ अशा भक्कम अवस्थेत तंबूत परतला. 
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळाची सुरूवात करायला पृथ्वी शॉ आणि टीम शिफर्ट उतरले. शिफर्टला हार्दिक पांड्याने झटपट बाद केले. ५व्या षटकात वैयक्तिक १० धावांवर पृथ्वी बाद झाला. त्य‍च षटकात लॉकी फरग्युसनने मनदीप सिंगलाही बाद केले. दिल्लीची अवस्था ३४/३ अशी झाली होती. कर्णधार ऋषभ पंत आणि ललित यादवने सघाच्या खात्यावर ६० पेक्षा अधिक धावा जमवल्या. य‍ादव वैयक्तिक २५ धावा काढून धावबाद झाला. पंतचं लक्ष विचलीत झालं आणि फर्ग्यूसनने त्याच संधीचा फायदा घेत मनोहरकडे झेल देण्यास त्याला उद्युक्त केले. रोमन पॉवेलला पायचित बाद केले. १४३/८ अशी दिल्लीची अवस्था झाली होती. पंतने ७ चौकारांसह ४३ धावा संघासाठी जमवल्या. अक्षर पटेलने ८ धावा काढून तर शार्दुल ठाकूर पायचित बाद झाला. रोमन पॉवेल हादेखील  पायचित बाद झाला. खलील अहमदचा शून्यावर झेल मॅथ्यू वेडने टिपला. मोहम्मद सामीने दोन बळी पाठोपाठ घेतले. सामना पूर्ण करण्याची औपचारिकता कुलदीप यादव आणि मुस्तफिझूर रेहमान यांनी पार पाडली. दिल्लीचा डाव १५७/९ अशा अवस्थेत संपला. लॉकी फरग्युसनला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ४ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात ४ महत्वाचे गडी बाद केले होते. 
उद्या चेन्नई सुपर किंग्स् आणि पंजाब किंग्स् यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. चेन्नई आपला पहिला विजय ह्या सामन्यात शोधत आहे.
Attachments area

रिपोर्टर

संबंधित पोस्ट