मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २१ मार्च पासून मुंबईत

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा महोत्सव स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल तसेच प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले हेही यावेळी उपस्थित राहतील.
या महोत्सवात जागतिक पातळीवरील ३०, भारतीय ५ आणि मराठी ५ असे एकूण ४० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना भारतीय चित्रपटांसोबत फ्रांस, इंडोनेशिया, जर्मनी, इस्त्राइल, रशिया, हंगेरी, सौदी अरेबिया, इटली, ब्रिटन, रोमानिया, ब्राझिल, स्पेन अर्थातच महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि मराठी सिनेमा इत्यादी प्रकारचे सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२२०२८५९८ (सकाळी ११ ते सायं ६ वाजेपर्यंत) संपर्क साधावा अथवा ऑनलाईन नोंदणीसाठी www.yiffonline.com संकेतस्थळाला भेट द्या. कोरोनाच्या कालखंडानंतर मुंबईत होणारा एकमेव यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट