मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

"जीवनदाता" ने समाजासमोर ठेवला आदर्श



मुंबई (ऋषिकेश तटकरे) : जागतिक महिला दिनाचे औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून जीवनदाता सामाजिक संस्थेने महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.याचा बोध घेऊन इतर संस्थांनीही अशाप्रकारे रक्तदान शिबिरे आयोजित करून महिलांना रक्तदानाची संधी उपलब्ध करून द्याव्यात असे उद्गार सुप्रसिद्ध उद्योजिका श्रीमती सत्यवती सत्यवान कोलगे यांनी नुकतेच येथे काढले.
       जीवनदाता सामाजिक संस्थेने मुंबईतील परेल येथील केईएम रक्तपेढीत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीमती सत्यवती सत्यवान कोलगे  यांनी केले. याप्रसंगी त्या उद्घाटक या नात्याने बोलत होत्या.
     त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की,महिला आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता असते.यामुळेच महिलांचा रक्तदानातील सहभाग कमी असतो परंतु  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  जीवनदाता संस्थेने 'घे भरारी रक्तदानासाठी ' या संकल्पनेवर आधारित केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचा एक वेगळाच स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करून दिला आहे, याबद्द्ल  मी त्यांना धन्यवाद देते.जीवनदाताचा हाच आदर्श इतर संस्थांनी अंगिकारून  अशाप्रकारे रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास रूग्णालयांना जाणवणारी रक्ताची टंचाई दूर होण्यास यामुळे  निश्चितच मदत होईल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले
     महिलांसाठीच आयोजित या खास रक्तदान शिबिरात जवळपास २०० महिलानी आपली उपस्थिती दर्शविली व त्यातून ९६ महिला रक्तदान करण्यात यशस्वी ठरल्या.ढाल,
तलवार व फेटा परिधान करून रक्तदात्या महिलांचे स्वागत करण्यात येत होते.
 सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सौ.जान्हवी जयराम नाईक,सौ.अश्विनी म्हात्रे ,संजना काटकर,आरोही काळे,सौ.वीणा गणेश आमडोसकर,सौ.नेहा नितिन कोलगे,डाॅ.रजनी ग्वालानी,सौ.सेजल कोळवणकर,चित्रकार योगिता कोलगे,सौ.संगीता गांगण, सौ.श्रावणी खेडेकर,श्रीमती मिलन शिरगावकर,श्री.गणेश आमडोसकर,श्री.नितिन कोलगे,,श्री.जयराम नाईक, श्री.विकास येवले.श्री.संजय कुलकर्णी  आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट