मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अाठवड्याची सुरूवात घसरणीने*



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रशियावर आणखी निर्बंध लादण्याच्या भीतीने क्रूडच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे बाजारपेठा खवळल्या आहेत. याशिवाय, दोन्ही राष्ट्रांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थोडक्यात, अस्थिरता कायम राहणार अाहे. जागतिक बाजारपेठांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. देशांतर्गत निवडणुकांचे निकाल काय लागतील, ह्यावर देखील बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.
७ मार्च रोजी सेन्सेक्स १,४०० अंकांनी घसरला, निफ्टी १५,९०० च्या खाली आला; रिअल्टी, बँका ४-५% घसरल्या. सेन्सेक्स १,४०२.७४ अंकांनी किंवा २.५% घसरून ५२८४२.७५ वर आणि निफ्टी ३६६.१० अंकांनी किंवा २.२५% घसरून १५,८६३.१५ वर बंद झाला. सुमारे ८३७ शेअर्स वाढले आहेत, २५४३ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२९ शेअर्स अपरिवर्तित आहेत.
कच्च्या तेलाच्या किमती १३ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. हा भारतासारख्या बाजारपेठांसाठी मोठा धक्का आहे. कारण भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या ८० टक्के आयातीवर अवलंबून आहे. तेलाच्या किमतींमध्ये होणारी प्रत्येक वाढ ही भारतासाठी मोठी जोखीम आहे. कारण यामुळे महागाईची चिंता वाढते, व्यापारात तूट वाढते आणि कॉर्पोरेट कमाई आणि आर्थिक वाढीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड फ्युचर्सने  दुपारी १३९.१३ डॉलरचा इंट्राडे उच्चांक गाठला, जो २००८ नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. त्याच वेळी, यूएस क्रूड १३० डॉलरच्या पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलर भारतीय रूपयाच्या तुलनेत ७७.११ अधिक बळकट झाला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट