मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक महिला दिनी महिला करणार रक्तदान



८ मार्च जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या हक्काचा दिवस. हा दिवस महिला अनेक प्रकारे साजरा करतात. कोणी पिकनिक काढतात, कोणी पार्टी करतात, कोणी वेगवेगळे मनोरंजन करत असतात. राजकीय पक्ष व इतर सामाजिक मंडळी या दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवतात. खूप काही फुकट वाटले जाते.पण याला अपवाद आहे ते केईएम रुग्णालयांमध्ये होणारे, केवळ महिलांसाठीच असणारे विशेष रक्तदान शिबिर. "घे भरारी रक्तदानासाठी" या संकल्पनेवर आधारित जीवनदाता सामाजिक संस्था गेली दोन वर्ष महिलांना रक्तदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला रक्तदानात मागे आहेत, हा शिक्का कायमचा नाही, पण थोड्याफार प्रमाणात प्रमाणात पुसण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना आणण्याचा हा प्रयत्न.मार्च २०२० ला सुरू केलेला या अभिनव सामाजिक उपक्रमात पहिल्याच वर्षी जवळपास ४०० महिलांनी हजेरी लावली. यावरून महिलांना रक्तदानासाठी संधी हवी असते याची जाणीव झाली व ती संधी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जीवनदाता संस्थेने केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचा एक वेगळा स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली आहे."स्त्री" म्हटली की अनेक समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. असे म्हटले जाते. त्यातील मोठी समस्या म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता पण असे असून सुद्धा कितीतरी महिला रक्तदानासाठी पुढे येतात, न घाबरता रक्तदान करतात. अभिमान वाटतो अशा महिलांचा. 

यातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे सर्वच महिलांचे हिमोग्लोबिन कमी नसते. खूप वर्षापुर्वी कधीतरी चेक केलेली हिमोग्लोबिन पातळी.  हाच न्यूनगंड महिलांना स्वतःहूनच रक्तदान पासून परावृत्त करीत असतो."जीवनदाता संस्थेने घे भरारी रक्तदानासाठी" म्हणत सर्व महिला वर्गाला साद घातलेली आहे. रक्तदान करण्यास प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. किमान त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी तरी कळू शकेल. या निमित्ताने महिलांची एकजूट दिसून येते. त्यांच्यातील समाजासाठी काहीतरी करण्याची भावना दिसून येते. 'होय मी रक्तदान करणारच' हे ध्येय दिसून येते. या वर्षी संस्थेने लाल रंगाचा ड्रेसकोड  ठेवलेला आहे.

जीवनदाता संस्थेमार्फत सर्व महिलावर्गाला रक्तदान करून तर बघा, आनंद मिळेल. अशी साद घालत "घे भरारी रक्तदानासाठी" संकल्पना मांडली आहे.या महिला विशेष रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सदस्य नितीन कोलगे यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती सत्यवान कोलगे यांच्या हस्ते  होणार आहे. ८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये हे केवळ महिलांसाठी असलेले विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. महिलांनी हा दिवस सामाजिक कार्य, रक्तदान करून साजरा करावा. असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क मीनल कुडाळकर ८२०८६१४४६०

आरोही काळे ८०८२५०७१९३ 

विजया जाधव ८९२८५१६५३६ व रक्तपेढी समुपदेशक 

कविता ससाणे ९१३७५५३७७४ यांच्याशी संपर्क साधावा

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट