मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नेत्रदीप प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, कोरोना मुळे यावर्षी या स्पर्धा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे.

*विविध स्पर्धा:*
वक्तृत्व, पररचित काव्यवाचन, चित्रपट गीत गायन आणि कथाकथन या सर्व स्पर्धा रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येईल.                                                   

*१) वक्तृत्व स्पर्धा:*
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे:-

१) लता मंगेशकर - एक अनमोल भारतरत्न
२) युक्रेन रशीया संघर्ष आणि जागतिक परिणाम
३) पर्यावरण संवर्धन माझी भूमिका
४) ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विध्यार्थ्यांवर होणारा परिणाम
५) राजकीय नेत्यांचे सामाजिक वर्तन

वक्तृत्व स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे:-

१. स्पर्धकांना वर दिलेल्या ५ विषयांपैकी एकाच विषयावर सादरीकरण करता येईल.
२. विषयाचे सादरीकरणाचा कालावधी ४ ते ६ मिनिटांचा असेल.
३. स्पर्धकांची एकच ऑडिओ क्लिप ग्राह्य धरली जाईल. पाठवलेली ऑडिओ क्लिप डिलीट करून पुन्हा पाठवल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
४. स्पर्धकाने आपल्या ऑडिओ क्लिपला कोणताही इफेक्ट देऊ नये. जसे की ऐको, बॅकग्राऊंड म्युझिक किंवा व्हॉईस इफेक्ट्स.

*२) चित्रपट गीत गायन स्पर्धा :*  
स्पर्धेचे नियम  पुढीलप्रमाणे:-

१. स्पर्धकांनी मराठी  किंवा हिंदी चित्रपटातील गाण्याचे सादरीकरण करावे.
२. सादरीकरणाचा कालावधी ४ ते ६ मिनिटांचा असेल.
३. स्टारमेकर सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. तसेच कोणताही डिजिटल इफेक्ट देता येणार नाही.

*३) पररचित काव्यवाचन स्पर्धा :*
काव्यवाचन स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे:-

१. कविता पररचित असावी.
२. सादरीकरणात मूळ कवीअथवा कवयित्रीचे नाव सांगावे.
३. कवितेच्या सादरीकरणामध्ये कोणताही डिजिटल इफेक्ट देऊ नये.
४. कवितांचे वाचन करावे परंतु त्या गायन स्वरूपात सादर करू नये.

*४)  कथाकथन स्पर्धा:*
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे:-

१. कथा सादर करण्याचा कालावधी ८ ते १० मिनिटांचा असेल.
२. कथेच्या सादरीकरणामध्ये कोणताही डिजिटल इफेक्ट देऊ नये.

*स्पर्धेचे सर्वसाधारण नियम:*
१) स्पर्धेसाठी नाव नोंदवण्याची अंतिम तारीख १८ मार्च २०२२ असेल.
२) सर्व स्पर्धकांनी आपल्या कलेचे किंवा आपल्या विषयाचे सादरीकरण हे मराठी भाषेतच असावे.
३) स्पर्धकांना आपली कला अथवा विषय सादरीकरणासाठी दिलेल्या वेळेपेक्षा ३० सेकंदाचा अतिरिक्त कालावधी ग्राह्य धरला जाईल
४) सर्व स्पर्धेसाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्यामध्ये कोणत्याही स्पर्धकाने अथवा संस्थेच्या सदस्यांनी हस्तक्षेप करू नये.
५) एका स्पर्धकाला जास्तीतजास्त तीन स्पर्धामध्ये सहभाग घेता येईल.
६) स्पर्धकाने आपली कला सादरीकरणाच्या सुरूवातीला आपले संपूर्ण नाव, शहर/ गावाचे नाव, नेत्रदीप प्रतिष्ठान हे समूहाचे नाव, स्पर्धेचे नाव, आणि  कवीचे आणि कवियत्री चे नाव किंवा कथा सादर करताना कथाकाराचे नाव  सांगणे अनिवार्य राहील.
७) स्पर्धकांनी आपल्या अंधत्व चे प्रमाणपत्र संस्थेने मागणी केल्यानंतर सादर करणे आवश्यक आहे.

वरील सर्व स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक दिले जातील परंतु  कोणत्याही एका स्पर्धेत सहभागी स्पर्धक संख्या २० पेक्षा जास्त असल्यास २ उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील

बक्षिसांचे स्वरूप:
प्रथम क्रमांक:    २,५००/- रुपये
द्वितीय क्रमांक:  २,०००/- रुपये
तृतीय क्रमांक:    १,५००/- रुपये
उत्तेजनार्थ:          १,०००/- रुपये प्रत्येकी

रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता संबधित स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे जाहीर केली जातील

विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम ही त्या स्पर्धकांच्या स्वतःच्या बचत खात्यात संस्थेतर्फे जमा करण्यात येईल, तरी सर्व विजेते स्पर्धकांचे बचत खाते असणे अनिर्वाय आहे, बक्षिसाची रक्कम इतर कोणाच्याही खात्यात जमा केली जाणार नाही, ह्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या व्यक्तींशी सायकांळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत संपर्क साधावा. स्पर्धेसाठी नाव नोंदवताना स्पर्धकांनी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर आपले नाव, शहर आणि सहभागी स्पर्धांची नावे लिखित स्वरूपात किंवा ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून संदेश पाठवावे. संपर्कासाठी मोबाईल नंबर पुढीलप्रमाणे:-
१) सचिन माने       : ९९८७३३२९११
२) निखिल देशमुख: ९५९४९९८१७३
३) रामदास निकम : ८०८०६२८६२३
४) भाग्यश्री गांधी   : ७३०३६३७८००

रिपोर्टर

संबंधित पोस्ट