मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखेचा वर्धापनदिन सोहळा प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे तसेच  ज्येष्ठ लेखक  अरुण फडके यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे लिखित 'देशोदेशीच्या लोककथा' या ४ बाल कथासंग्रहाचे व लता गुठे लिखित मुलांसाठी मजेदार काव्यकोडी अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रबोधनकार ठाकरे संकुलचे अरविंद प्रभू आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या  पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट आणि पूजा राईलकर यांच्या हस्ते झाले. चित्रा वाघ यांना प्रथम पुरस्कार, उज्वला पै यांना द्वितीय पुरस्कार आणि चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.  'पुस्तकं माणसाला घडवतात' या विषयावर, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, नगरसेविका, लेखिका  ज्योती आळवणी यांच्याशी सायली वेलणकर यांनी सुसंवाद साधला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सुरेख केले होते. सूत्रसंचालन प्रशांत राऊत व सायली वेलणकर यांनी केले तर आभार निशा वर्तक यांनी मानले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट