मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

प्राजक्ता चौधरी ठरल्या"नारी तू नारायणी रत्न"पुरस्कार विजेत्या आणि साहित्यिक पत्रकारांचा विशेष सन्मान



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :"नारी तू नारायणी रत्न"पर्व दोनच्या निमित्ताने सौंदर्यवतींचा शोध घेणारा शानदार सोहळा ठाणे यथील समारंभ लॉन्स या भव्य जागेत आयोजित करण्यात आला होता. हेमा भट यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या शो टॉपर ठरल्या डॉ. सुमाया रेश्मा तर फॅशन विश्वातील कल्पक आणि प्रयोगशीलतेसाठी लौकिक असलेल्या धनश्री शेंड्ये यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली."नारी तू नारायणी रत्न"प्राजक्ता चौधरी यांना प्रदान करण्यात आले तर, लाझरीन, विणू पाठक, प्रिया दर्शनी कलाल, सुमिता दहाड उपविजेत्या ठरल्या.

फॅशनबीझ आणि फिरोझ लेबलच्या माध्यमातून फॅशनविश्वात कल्पक आणि प्रयोगशील म्हणून ओळख असलेल्या तसेच भारतीय आणि पाश्चात्य शैलीच्या वस्त्रनिर्मितीत कार्यरत असलेल्या धनश्री शेंड्ये यांची उत्तम नृत्यांगना आणि कलावंत म्हणूनदेखील ओळख आहे. कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी यावेळी स्पर्धकांच्या कौशल्याचे कौतुक केले शिवाय त्यांचे या क्षेत्रातील भवितव्य उत्तम असल्याचेही आवर्जून नमूद केले. 

ज्युरी तसेच शो टॉपर डॉ. सुमाया रेश्मा यांनी अनेक फॅशन शो मध्ये सहभाग दिला असून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना प्रोत्साहित केले. दंतवैद्य अशी त्यांची ओळख असूनही त्यांनी फॅशनची आपली कला जोपासली आहे. त्याचबरोबर त्या समाजसेवेशीही निगडीत आहेत. त्यांनी या कार्यक्रमातून आपल्या विविध शैली व कलात्मकतेचे प्रदर्शन घडवून आणले.

कार्यक्रमाच्या आयोजिका तसेच संयोजिका हेमा भट यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. सौंदर्यवतींचा शोध घेत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा त्यांचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर त्यांनी कर्तृत्ववान महिलांना 'नारी तू नारायणी' हा पुरस्कार देण्याची प्रथादेखील सुरु केली आहे. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व होते. 

स्पर्धेतील अन्य प्रवर्गातील विजेत्यांची नावे अशी :-  सानवी शरण, वृद्धी तळकर, ओवी बने रुहानी, पहल चव्हाण, साई कृष्णा बिस्वाल, अद्यसा साहू, आरुषी आतोस्कर, हितिका, उर्व भट. 

"नारी तू नारायणी रत्न"या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. साहित्यिका प्रा. दीपा ठाणेकर, या प्राध्यापिका असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती विभागप्रमुख आहेत. त्याचबरोबर साहित्यिक पत्रकारिता यांच्याशी संबंधित लिखाणदेखील गेली ३ दशके करत आहेत. 

मराठी साहित्य व कला सेवा, महाराष्ट्र' ह्या संस्थेचे संस्थापक गुरुदत्त वाकदेकर हेदेखील साहित्यिक  पत्रकार स्तंभलेखक असून विविध प्रसारमाध्यमांसाठी पत्रकारिता करत आहेत. साहित्यिक संस्थांशी आणि चळवळींशीही ते निगडीत आहेत.

गोविंद शेट्टी हे मुक्त पत्रकार असून अनेक संघटनांशी ते संबंधित आहेत. भारतीय पत्रकार संघटनेशीही ते निगडीत असून विविध विषयांवर त्यांचा अभ्यास आहे.

रामचंद्र प्रतिष्ठान' चे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांचाही ह्रदय सत्कार ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. अशोक शिंदे हेदेखील विविध सामाजिक संस्थांशी आणि प्रसारमाध्यमांशी निगडित आहेत. 

सदर कार्यक्रम शिस्तबद्घ पद्घतीने पार पाडण्यासाठी सुमीत बोत्रा, मंदार तांडेल, डॉ. संगीता पाटील, मोनिका पुरी,  प्रियांका राऊत, सागर, इम्यॅन्युअल, अक्षय, रेहान, आयेशा अली, नरेश मनेरा, अंजली कुकाडिया, पुनिता पांचाळ, सारिका कुलकर्णी, शबाना सांचवाला, श्वेता दावडा, सोना गुरनानी, कमलेश पाठक, स्मिता गिरी, कनिका प्रितवानी, रितिका बन्सल, गर्वी ठक्कर, अनघा झंकार, अमिता रायचुरा, अनिका उडानकुट, भक्ती ठक्कर, आस्था नाथवानी, ज्योती बेन बडियानी, मयूरी शेठ, निर्मला बेन, प्राची दुबे, स्वाती पांगी, अवनी बावेजा यांनी परिश्रम घेतले. लॅक्मे अकॅडमी, हिनल सलून अँड स्पा, ग्लोस ब्यूटी पार्लर यांचे सहकार्य मिळाले. हर्षल राणे यांनी कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट