मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पर्यावरणपुरक आणि अद्ययावत मोहन रावले उद्यानाचे लोकार्पण मुंबईतलं नवं पर्यटन स्थळ शिवडी परिसरात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०१७ च्या मनपा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षाद्वारे दिलेल्या वचननाम्यात सचिन पडवळ यांनी समस्त शिवडीकरांना एक वचन दिले होते की, या शिवडी विभागात एक सुंदर असे उद्यान उभारले जाईल. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. वचननाम्याची, कर्तव्याची आणि उद्यानाची वचनपूर्ती झाली.
नगरसेवक सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक २०६ मधील टी. जे. रोड येथील भारत इंडस्ट्रीज समोर "स्वर्गीय शिवसेना खासदार श्री. मोहन रावले उद्यानाचा लोकार्पण सोहळा" मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळेस मोहन रावले यांच्या पत्नी, मुलगी आणि परिवार देखील उपस्थित होते.
या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्यान्वित केलेली "माझी वसुंधरा" ही संकल्पना, सुशोभित प्रवेशद्वार, या उद्यानात "मियावाकी पद्धतीने" विलायती मेंधी, कदंब वृक्ष, पोफळी, नीम, कांचन वृक्ष, आवळा, वड, पिंपळ, ताम्हण, आंबा, करंज, अशोक, महोगनी वनस्पती, जांभूळ, बदाम, बकुळ, सागवान, चाफा अशी विविध प्रकारची ५०० झाडे, मल्लखांब, रेडिओ, योगा शेड, मुलांसाठी खेळणी, आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक बैठक व्यवस्था, परगोला, सुसज्ज सुरक्षा रक्षक माळी चौकी अशा प्रकारचे शिवडीकरांसाठी नवे संजीवनी देणारे उद्यानच नव्हे तर मुंबईचे नवे पर्यटन स्थळ बनविण्यात आले आहे.
गेल्या पन्नास वर्षांपासून शिवडी परिसरातील जनतेला चिरपरिचित आत्महत्येचा केंद्रबिंदू असलेला 'मौत का कुवा' म्हणजेच चायना मिलचा खाडा. या जागेची पार्श्वभूमी म्हणजेच येथील चायना मिल मध्ये कपडा बनल्यानंतर धुलाई विभागातलं रासायनिक पाणी हे या तलावामध्ये सोडले जायचे. त्यामुळे याजागी चिखल व्हायचा. या तलावामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले. शेकडो आत्महत्या या तलावात झाल्या आणि प्रसारमाध्यमांतून या तलावाचे 'मौत का कुवा' असे नामकरण झाले. 
आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या कार्यकाळात तो खाडा बुजवून टाकण्यात आला. गेली १० वर्षे ती जागी मोकळीच पडून राहिली होती. आज त्याच जागेवर पर्यावरणपुरक आणि अद्ययावत उद्यान दिमाखात उभं राहिलं आहे.
या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात 
शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, माजी आमदार दगडु दादा सकपाळ, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, विधानसभा संघटक सुधीर साळवी, उप विभागप्रमुख गजानन चव्हाण, उप विभागप्रमुख पराग चव्हाण, नगरसेविका सिंधुताई मसूरकर, माजी महापौर/नगरसेविका श्रद्धा जाधव, विधानसभा महिला संघटिका लता रहाटे, उप विभागसंघटिका श्वेता राणे, उप विभागसंघटिका रूपाली चांदे, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखासंघटक शुभदा पाटील यांच्यासोबत शिवडी विधानसभेतील सर्व पुरूष महिला पदाधिकारी तसेच शिवडीकर जनता उपस्थित होती.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट