मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वसई किल्ला, भुयारी मार्ग व नागेश महातीर्थ स्वच्छता मोहीम फत्ते

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्कंद पुराणात उल्लेख असलेले श्रीनागेश महातीर्थ, पोर्तुगीजांच्या शासनाचा व जुलमाचा तसेच मराठा सैन्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वसई किल्ल्यात देश विदेशातून रोज शेकडो लोक भेट देतात. गेली २ वर्ष लॉकडाऊन मुळे पर्यटन क्षेत्र बंद होती. हळूहळू निर्बंध शिथिल होत आहेत व पुन्हा पर्यटनक्षेत्रे खुली होत आहेत.

गड-किल्ले व निसर्ग हे आनंद लुटण्यासाठी, शिकण्यासाठी व पुढील पिढीला जसेच्या तसे देण्यासाठी असतात. पण लोक आनंदाच्या भरात किंवा अज्ञानामुळे अशी सुंदर व ऐतिहासिक स्थळं अस्वच्छ करून जातात. स्वकृतीतून व समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला जसाच्या तसा मिळावा ह्या उदात्त हेतूने "आमची वसई" सातत्याने कामनकरत असते. त्या अंतर्गतच नैसर्गिक, ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र रक्षणाचा प्रयत्न "आमची वसई" सामाजिक संस्था गेल्या १० वर्षापासून निष्ठेने आणि श्रद्धेने करत आहे. 

"किल्ल्याचे संवर्धन व्हावे, शासनाने वेळीच डागडुजी करावी, हे खरेच पण पर्यटकांनी देखील किल्ल्याचे सांस्कृतिक मूल्य जपावे ही अपेक्षा आहे. किल्ल्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अनेक लोक जाताना उरलेले अन्न, प्लास्टिक डिशेस, पेले, पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या,  बेफिकीरपणे इतरत्र फेकून, निघून जातात, शासन व स्वयंसेवी संघटना किती काम करणार ? आपण जागरूक नागरिक म्हणून देखील आपली जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे", असे मत धर्मासभेचे सचिव व आमची वसई चे संस्थापक पं. हृषीकेश वैद्य गुरुजी यांनी व्यक्त केले.

रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी "आझादी का अमृतमहोत्सव" अंतर्गत केंद्रीय पुरातत्व विभाग व आमची वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आमची वसई चे संस्थापक अध्यक्ष पं. हृषिकेश वैद्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गमित्र पुरुषोत्तम देवधर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम पार पडली. आमची वसईच्या ७५ युवक युवतींनी वसई किल्ला, भुयारी मार्ग व नागेश महातीर्थ येथे स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी पुष्कराज करंदीकर, रुग्णमित्र राजेंद्र ढगे, प्रमोद दवे, विनोद चोपडेकर, मनीष मकवाना, मनोज मोरे, आशिष ठठेरा, केशव भावसार, भूपेश पाटील, नितीन वानखेडे, राहुल घोष, हिम्मत घुमरे, देवेंद्र गुरव, मनोज मोरे, धर्मासभा सदस्य अक्षय वर्तक, निनाद सहस्रबुद्धे, महिला सदस्य रोशनी वाघ, निर्मला कामत, राष्ट्रीय महिला मॅरेथॉन धावपटू मिनाज नडाफ, क्षिप्रा कामत, वैष्णवी भट व मधुबाला सिंह आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाने मोलाचे कार्य केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट