मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिवडी राष्ट्रवादीतर्फे कॅन्सरग्रस्तांना धान्य वाटप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : १६ फेब्रुवारी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार जयंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून "सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट" (स्वामी) ह्या कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
त्याप्रसंगी स्वामी संस्थेच्या कार्याचा आलेख मोहन कटारे यांनी मांडला. गेली अनेक वर्षे कॅन्सरग्रस्त, रुग्ण, विद्यार्थी, आदिवासी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी स्वामीतर्फे निरपेक्ष भावनेने चालू असलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी सादर केला.
स्वामीच्या कार्याची दखल शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश येवले यांनी घेतली. "अतिशय छोट्याश्या जागेत मोठमोठया संस्थांनाही मागे टाकणारं कार्य आपण करत आहात. ज्येष्ठ नागरिक मिळून चालवत असलेली ही संस्था तरुणांनाही लाजवेल असं कार्य करत आहे. आपल्या ह्या कार्याने प्रेरित होऊन आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार जयंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू आम्ही देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा." अशी विनंती केली.
त्याप्रसंगी शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक भंडारे, विलास इंगळे, अरविंद घाडगे, संदीप घाटे, राजेंद्र खानविलकर, अनंत घोगळे, विकास राऊत, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष इसरार खान, प्रभाग अध्यक्ष संतोष वराडकर, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत दिवटे यांच्यासोबत स्वामी संस्थेचे मोहन कटारे, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, सुमंगल गुरव, साध्वी डोके आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी मा. नामदार जयंतराव पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केल्या

रिपोर्टर

संबंधित पोस्ट