मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

चीनची करामत ६जी इंटरनेट स्पीड थक्क करणारा*

*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सध्या जगभरात ५जी वर काम सुरू आहे, त्यामुळे चीनने या दिशेने एक पाऊल पुढे टाकत ६जी वर काम सुरू केले आहे. त्याचवेळी ६जी तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या चिनी संशोधकांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा स्ट्रीमिंग स्पीडमध्ये नवा विक्रम केला आहे. संशोधकांनी व्होर्टेक्स मिलीमीटर वेव्हजचा वापर करून एका सेकंदात एक टेराबाइट डेटा एका किलोमीटरपर्यंत पाठवला.

व्होर्टेक्स मिलिमीटर लहरी हा उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींचा एक प्रकार आहे, जो वेगाने फिरतो. बीजिंग विंटर ओलंपिक कंपाऊंडमध्ये गेल्या महिन्यात स्थापित केलेली प्रायोगिक वायरलेस कम्युनिकेशन लाइन एकाच वेळी दहा हजार उपकरणांशी कनेक्ट होऊ शकते.

तसेच अधिक हाय-डेफिनिशन लाइव्ह व्हिडियो फीड स्ट्रीम करू शकते. टीमने असा दावाही केला आहे की, हायपरसोनिक शस्त्र ६जी तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्य शोधू शकते आणि त्यांच्याशी संवाद साधू शकते.

ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट जास्त वेग असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांना नेटवर्कमुळे काही वेळा ब्लॅकआउटचा सामना करावा लागतो.

चीनने अनेक प्रसंगी सूचित केले आहे की, ते भविष्यातील ६जी तंत्रज्ञान युद्धपातळीवर वापरत आहेत. या प्रयोगातून असे दिसून आले आहे की चीन ६जी साठी संभाव्य महत्त्वाच्या तंत्रज्ञानावरील संशोधनात जगात आघाडीवर आहे. चीनी शास्त्रज्ञांचा दावा आहे की त्यांनी ६जी तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे ५जी पेक्षा किमान १०० पट वेगवान आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट