मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शिवडी पर्यावरणस्नेही करण्याचा संकल्प शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांचा पुढाकार.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : "अरे मानवा, तूच वसुंधरेचा आधार ! जगव वृक्ष वनांना, तेच खरे तारणहार !!" ह्याच उक्तीला साजेसं काम मुंबईच्या शिवडी परिसरात होत आहे. त्यासाठी विभागीय शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पुढाकार घेतला आहे. 
पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी "माझी वसुंधरा" ही संकल्पना अमलात आणली. या संकल्पनेनुसार काल प्रभाग क्रमांक २०६ मधील स्वर्गीय श्री. मोहन रावले उद्यानातील रिकाम्या जागेत "मियावाकी पद्धतीने" म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावण्याच्या पद्धतीने रोपं लावण्यात आली. ह्या पद्घतीने लावलेली झाडे आजूबाजूला न पसरता सरळ उंच वाढतात. या उद्यानात विलायती मेंधी, कदंब वृक्ष, पोफळी, नीम, कांचन वृक्ष, आवळा, वड, पिंपळ, ताम्हण, आंबा, करंज, अशोक, महोगनी वनस्पती, जांभूळ, बदाम, बकुळ, सागवान, चाफा अशी विविध प्रकारची ५०० झाडे लावण्यात आली. या कामाचे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखासंघटक शुभदा पाटील तसेच शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट