मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आशिर्वाद सेल्फी महोत्सवाचे बक्षिस वितरण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्या भ्रमणध्वनीमुळे (मोबाईल) घरात असूनदेखील माणसं एकत्र येत नव्हती, त्याच भ्रमणध्वनीचा वापर करून कुटुंबियांना एकत्र आणण्यासाठी आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले यांच्या सुपीक डोक्यातून "आशिर्वाद सेल्फी महोत्सव २०२२" संकल्पना बाहेर आली. आपल्या कुटुंबियांसोबत, आईवडिलांसोबत, जोडीदारासोबत, मित्र किंवा मैत्रिणीसोबत सेल्फी काढून सहभाग घेण्यासाठी कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते बांद्रा ह्या क्षेत्रात रहाणार्‍या नागरिकांना आमंत्रित करण्यात आले. एक खास गट देशसेवा करणार्‍या आजी-माजी सैनिकांसाठी देखील निर्माण केला. बघता बघता महोत्सवासाठी नागरिकांनी चांगलाच सहभाग नोंदवला.
आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे आयोजक उमेश येवले यांनी आपल्या मनोगतात म्हणाले, "आशिर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ च्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही नवीन संकल्पना स्वीकारायला थोडा वेळ लागतो, पण एकदा ती स्वीकारली गेली की त्याचं लोण पसरायला वेळ लागत नाही. त्या अर्थाने आपण ट्रेंड सेटर आहोत आणि मला आनंद आहे की स्पर्धा प्रमुख गुरुदत्त वाकदेकर, परीक्षक रमेश वाणी आणि माध्यम प्रायोजक आदर्श स्वराज हे या अनोख्या संकल्पनेचे प्रारंभ कर्ते ठरले आहेत."  
परीक्षक रमेश वाणी यांनी शुभेच्छा देताना सांगितले, "माझ्या आजवरच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे मी परीक्षण केलं आहे. स्पर्धा म्हंटली की जीत हार आलीच. म्हणूनच ज्यांचे क्रमांक आले नाहीत त्यांनी नाराज न होता आपल्याकडून अजून चांगलं काय करता आलं असतं याचा नक्कीच विचार करा.  या अनोख्या संकल्पनेचे आपण भाग आहात हादेखील आपला एकप्रकारे विजय आहे, असं मला वाटतं."
या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक असलेल्या आदर्श स्वराज्यचे उदय पवार यांनीही विजेत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सोबतच आशिर्वादच्या ह्या अनोख्या महोत्सवाचा एक महत्वाचा घटक होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. तसेच यापुढेही असे नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करा आम्ही आपल्या सोबत आहोत हा शब्द देऊन आयोजकांचे मनोबल वृद्धिंगत केले.
स्पर्धा प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी, आशिर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट आणि आशिर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ ह्या महोत्सवात मला स्पर्धा प्रमुख ही जबाबदारी देऊन समाजात चांगलं काम करणार्‍या संस्थेने आणि अध्यक्ष उमेश येवले यांनी जो विश्वास दाखवला त्यासाठी त्यांचे  मनःपूर्वक आभार मानले. आम्ही ह्यापूर्वी कोणताच कार्यक्रम एकत्र केलेला नाही, असं असताना देखील ही संधी आणि विश्वास दाखवल्याबद्दल अध्यक्षांचे मनापासून आभार मानले. स्पर्धेचं चोख आणि निष्पक्ष परीक्षण केल्याबद्दल स्पर्धेचे परीक्षक रमेश वाणी, माध्यम प्रायोजक आदर्श स्वराज्य आणि संपादक उदय अशोक पवार यांचे आणि त्यांच्या टीमचेही मनःपूर्वक आभार मानले.

*आशिर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ अंतिम निकाल*
*गट - मी सैनिक*
प्रथम क्रमांक - भरत महादेव सुगदरे
द्वितीय क्रमांक - नारायण केशव जाधव
तृतीय क्रमांक -  शशिकांत बाबा मोरे

*गट - मी आणि आई किंवा बाबा*
प्रथम क्रमांक - राजन वसंत देसाई आणि आई
द्वितीय क्रमांक - सुनिता गोरे आणि आई
तृतीय क्रमांक - तुषार पाटेकर आणि आईवडिल

*गट - मी आणि माझे कुटुंब*
प्रथम क्रमांक - नंदा मस्के आणि कुटुंब
द्वितीय क्रमांक - उल्हास हरमळकर आणि कुटुंब
तृतीय क्रमांक - अनिल अंबाजी जाधव आणि कुटुंब

*गट - मी आणि माझा मित्र किंवा मैत्रिण*
प्रथम क्रमांक - समीर श्रीनाथ पवार आणि मित्र
द्वितीय क्रमांक - प्रतिभा सावंत आणि मैत्रिणी
तृतीय क्रमांक - माधव गजानन भालेराव आणि मित्र

*गट - पती-पत्नी (जोडीदार)*
प्रथम क्रमांक - रुपेश लिंगायत आणि पत्नी
द्वितीय क्रमांक - मयूर अभिजीत कारखेले आणि पत्नी
तृतीय क्रमांक - नवनाथ लक्ष्मण गाढवे आणि पत्नी

सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुजा येवले, राजेंद्र खानविलकर, सुमित राणे यांनी मोलाचे योगदान दिले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट