पुन्हा एकदा पावसाच्या धारा कोसळणार

           सध्या तरी निसर्गाचे गणित हे पुरते बिघडले आहे, राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. तर अशातच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यामध्ये पावसाने जबरदस्त जोर धरला होता त्यामुळे अनेक पिकांचं नुकसान सुद्धा झालं. अशातच हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजामुळे पुरती शंका निर्माण झाली आहे. 

          डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावलं आहे. मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर 27 डिसेंबर रोजी विदर्भाच तुरळक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने दर्शविला आहे. तूर्तास तरी येणार नवीन वर्ष हे सोबत पाऊस घेऊन येईल असं बोलायला काही हरकत नाही. 

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट