Breaking News
देशात गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या ७ हजार ४४७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या ओमायक्रॉनचे ८८ रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा आकडा खूपच गंभीर असा आहे. आणि याचमुळे कि काय हा विषाणू, डेल्टा विषाणूला सुद्धा मागे टाकू शकतो याची चिंता वाढली आहे.
देशात जीवघेण्या कोरोना नविषाणूचं प्रादुर्भाव हा सुरूच आहे. एकीकडे काही प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असताना, ओमायक्रॉन सारख्या नव्या विषाणूने डोकं वर काढलं आहे. दिवसागणिक या संख्येमध्ये वाढ होत आहे, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ८६ हजार ४१५ आहे. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या वाढून ४ लाख ७६ हजार ८६९ वर पोहोचली आहे. देशात एकूण ८८ रुग्ण हे ओमायक्रॉन चे आढळले आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आढळले असून हा आकडा अजून प्रमाणात वाढत आहे. सध्या साऱ्याच यंत्रणा कोरोना सोबत ओमायक्रॉन विषाणू सोबत सुद्धा दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत, परंतु एक जाणकार नागरिक म्हणून सुद्धा आपण याबद्दलची काळजी घेतली पाहिजे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant