मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

माझी निष्ठा राजसाहेबांना अर्पित आहे - बाळा नांदगावकर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा समाज माध्यमातून सुरु झाल्या आहेत.

            राज ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर होत आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बाळा नांदगावकर हेदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संदेश समाज माध्यमांमधून सामायिक होत आहेत. त्यावर उत्तर देताना बाळा नांदगावकर म्हणाले, "एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका ओळीत सांगून जाते. "तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम"." गाण्याच्या एकाच ओळीत नांदगावकरांनी ह्या खोडसाळ वृत्ताचे खंडन केले.

          माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर पुढे म्हणाले, "मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. समाज माध्यमांच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस चांगलेच माहीत आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात, पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही आणि जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही."

         सध्या राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावेळी ठाकरे आणि नांदगावकर सोबत होते. राज ठाकरे पुण्याला रवाना झाले तेव्हा नांदगावकर मुंबईत परतले. त्यांच्या शिवडी मतदारसंघातील मनसेच्या कार्यालयाचे १८ डिसेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी नांदगावकर मुंबईत परतले आहेत.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट