Breaking News
बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. - देवेंद्र फडणवीस
नाशिक विधानपरिषद लढतीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे नेतृत्व करणारे उमेदवार मंगेश देशममुख यांचा पराभव झाला आहे. एकीकड़े बावनकुळे यांनी काँग्रेसवर दणदणीत विजय मिळवल्या नंतर, देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचे कौतुक करत महाविकास आघाडीला टोला सुद्धा लगावला आहे. “तीन पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व विजय शक्य असतात हे गणित चुकीचं असल्याचं या विजयानं स्पष्ट केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांना शुभेच्छा देत, फडणवीस यांनी स्वतःच्या विजयापेक्षा आज त्यांना जास्त आनंद झाला आहे असे मत व्यक्त केले. माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकासआघाडीला चपराक दिली आहे. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं विधान सुद्धा फडणवीसांनी सगळ्यांसमोर मांडले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant