Breaking News
कोरोनाच सावट संपत नाही कि अजून एका नवीन वेरियंटचे संकटं जगासमोर ठाकले आहे. आणि या सगळ्यामधे महत्वाची बाब म्हणजे ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. मुंबईत आढळलेल्या दोन ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कात आलेल्या ३२० जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जातंय. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता १० वर गेली आहे. तर देशातील संख्या २३ वर गेली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दक्षिण आफ्रिकेमध्ये हि डेल्टाची लाट आल्यामळे, तिकडून आलेल्या प्रवाशामार्फत हा वेरीयंट मुंबई मध्ये आला. शनिवारी या वेरीयंटचा पहिला रुदन हा डोंबिवली मध्ये सापडला, त्यानंतर पिंपरीमधील ६ आणि पुण्यामधील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. इतर सगळ्या व्हायरसपेक्षा ओमायक्रोन हा खूप घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमायक्रॉन रुग्ण त्याच्या बरोबर १० ते २० लोकांना संक्रमित करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत शाळा सुरु करणे, आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करणे याबाबतीत फेरविहार करण्यात येत आहे. तूर्तास तरी या वेरियंट पासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर लसीकरण हा एकच उपाय आपल्या सगळ्या समोर आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant