मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सात रस्ता येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

मुंबई,(प्रतिनिधी)-सम्राटशेअर आणि केअर असोसिएशनच्या संचालिका डाॅ.मयुरी शिंदे आणि समाजसेवक डाॅ.संतोष शिंदे यांच्यावतीने रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंबईतील सातरस्ता मधील सुर्यकांत क्रिडा मंडळ,रसूल जिवा कम्पाऊंड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन‌ करण्यात आलेले आहे.

     या शिबिरात नामांकित रूग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांमार्फत संपूर्ण शरिराची तपासणी करण्यात येणार असून रूग्णांच्या हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता, शरिरातील अवाढव्य असणा-या चरबीचे प्रमाण ,मधुमेहाचे वाढते प्रमाण ,उच आणि कमी रक्तदाब,रक्तगटाची तपासणी करून रोगाचे अचूक निदान करून मोफत औषधेही यावेळी देण्यात येणार आहेत.तसेच डोळ्यांची तपासणी आणि ईसीजी देखील यावेळी करण्यात येणार आहे.

     या शिबिरात बहुजन जनता दलाचे अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे ,विभागीय खासदार अरविंद सावंत,विभागीय आमदार सो.यामिनी जाधव,आमदार सुनिल शिंदे,नगरसेविका सौ. सुरेखा लोखंडे आदी मान्यवरही उपस्थित रहाणार आहेत,तेव्हा अधिकाधीक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन समाजसेवक संतोष शिंदे यांनी केलं आहे.

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट