मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल

BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल

मुंबई - जगप्रसिद्ध मोटर कंपनी BMW ने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत CE 04 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व वेगवेगळ्या सुविधांनी सज्ज असलेल्या या स्कूटरची एक्स शोरूम किंमत १४.९० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या ही स्कूटर सिंगल व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ती इम्पिरियल ब्लू आणि फिकट सफेद रंगात खरेदी करता येणार आहे. या स्कूटरचं बुकिंग सुरू झालं आहे.

BMW CE 04 ची वैशिष्ट्ये

  • या स्कूटरमध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर ३१ किलोवॅटचं आउटपूट देते. ४१ बीएचपी पॉवर आणि ६१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर २.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रति तास वेग पकडू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
  • या स्कूटरचा जास्तीत जास्त वेग १२० किमी प्रति तास आहे. यात राइड मोड, १०.२५ इंच टीएफटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स सुविधा आहेत.
  • स्कूटरमध्ये ८.५ केडब्ल्यूएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर १३० किमीची रेंज देते. बॅटरी चार्ज होण्यास ४ तासांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. चार्जिंगचा वेळ जास्त वाटत असल्यास कंपनी ग्राहकांना काही किंमत आकारून फास्ट चार्जर ऑफर करते. या चार्जरचा वापर केल्यास बॅटरी १ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
  • CE 04 च्या बॉडी पॅनेलला स्टायलिश डिझाइन देण्यात आलं आहे. स्कूटरची सीट बेंचसारखी आहे. एक लहान विंडस्क्रीन किंवा चाके आणि ऑफसेट मोनोशॉक सारख्या डिझाइन घटकांचा समावेश आहे.
  • स्कूटर १५ इंचाच्या चाकांवर चालते. गाडीच्या दोन्ही टोकाला २६५ मिमीचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट