मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

मुंबई ( राजेंद्र साळसकर) -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार व विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीराचे संपूर्ण नियोजन उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी केले होते.

     या महारक्तदान शिबीराचे उद्घाटन दक्षिण मुंबईचे ंखासदार तसेच शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत तसेच माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी केले.

     या महारक्तदान शिबीरात मुंबईतील के.ई.एम.रूग्णालय, सायन रूग्णालय,नायर रूग्णालय   आणि वाडिया रूग्णालय आदि रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या.मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असूनसुद्धा एकुण ९३४ रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला त्यापैकी ८५७ रक्तदाते रक्तदान करण्यात यशस्वी झाले.या सर्व रक्तदात्यांना बोरोसील कंपनीची इस्त्री भेट देण्यात आली होती.

      या शिबीराला मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव,राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक बबन कनावजे,इंदिरा काँग्रेस पक्षाचे गोरख कांगणे,समाजवादी पार्टीचे साजिदभाई तसेच शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आदिंनी सदिच्छा भेट दिली. त्याचबरोबर सर्व माजी नगरसेवक रमाकांत रहाटे,दत्ता पोंगडे,अनिल कोकीळ,सचिन पडवळ,सिंधू मसूरकर,सौ.लता रहाटे,सौ. वैभवी चव्हाण सौ.श्वेता राणे तसेच सौ.गौरी चौधरी,सौ. रूपाली चांदे,सौ.दिव्या  घाडीगावकर,पवन जाधव,सुप्रित म्हात्रे,श्रृती पोटले,शार्दुल म्हाडगुत  

या शिवसेना पदाधिका-यांसोबत सर्व आजी -माजी पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.

  सदर महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख विजय इंदुलकर,किरण तावडे, मिनार नाटाळकर,जयसिंग भोसले,बैजू हिंदोळे आदिंनीं रक्तदाते आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट