Breaking News
विठ्ठल मंदिरात संपन्न झाला महाद्वारकाला
सोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी यात्रेच्या सांगतेसाठी आज महाद्वारकाल्याचा उत्सव झाला. परंपरेप्रमाणे काल्याच्या वाड्यातून मदन महाराज हरिदास यांच्या डोक्यावर पांडुरंगाच्या पादुका बांधण्यात आले. यानंतर विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपामध्ये पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याची दहीहंडी फोडून महाद्वार काल्याचा उत्सव संपन्न झाला. यानंतर काल्याची आणि लाह्यांची मुक्त उधळण करत मदन महाराज हरिदास यांच्यासह पांडुरंगाच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले. यावेळी हरिनामाच्या जयघोषात गोपाळकाला गोड झाला गोपाळानी गोड केला… असा जयघोष करत काल्याचे वाटप झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar