मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाची मंजुरी

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या काही वर्षांपासून ग्रासणारे निराशेचे मळभ आता हळूहळू दूर होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी काही अनुकूल घटना घडत आहेत. उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळालं. निवडणूक आयोगात ठाकरे गटाला सातत्याने निराशा मिळाली. पण आता पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे. निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट