मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कॅम्लिन उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

कॅम्लिन उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई - चित्रकलेसाठीच्या साहित्य निर्मितीमध्ये जगप्रसिद्ध असलेल्या कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे एक उत्तम उद्योजक व रंगांचा निर्माता हरवल्याची खंत उद्योग आणि कला विश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे या कंपनीची धुरा वाहिली. कॅमलिन हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून पुढं आणण्यात सुभाष दांडेकर यांचा मोठा वाटा होता. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी लहानांपासून थोरांपर्यंत सर्व कलाप्रेमींच्या आयुष्यात रंग भरले.

शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता व मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला.

सुभाष दांडेकर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं राज्यातील व्यापार व उद्योगाच्या वाढीसाठी अनेक नवे उपक्रम सुरू केले. त्यांच्या निधनानं एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना उद्योग वर्तुळात व्यक्त होत आहे. कॅमलिनचा पसारा वाढवताना त्यांनी मूल्यांशी तडजोड केली नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिलं. नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी जी साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करून सतत शिकण्यावर त्यांचा भर होता.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट