मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आता आनंदी क्षणांत सहभागी होण्यासाठीही कैद्यांना मिळू शकतो पॅरोल

आता आनंदी क्षणांत सहभागी होण्यासाठीही कैद्यांना मिळू शकतो पॅरोल

ट्रेण्डिंग      

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने आज पुढील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलाची पाठवणी करण्याकरीता खुनाच्या आरोपांतील दोषसिद्ध आरोपीला १० दिवसांचा पॅरोल मंजूर केला.दोषसिद्ध आरोपीला वैद्यकीय कारणास्तव किंवा आकस्मिक परिस्थितीत कुटुबीयांच्या दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. तर आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी पॅरोल का मंजूर केला जाऊ नाही ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. हा सवाल करत कैद्यांना पॅरोलवर सोडण्याबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

मुलाला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. त्याच्या शिक्षणाचे शुल्क आणि इतर खर्चाची व्यवस्था करण्यासाठी तसेच त्याला निरोप देण्यासाठी विवेक श्रीवास्तव दोषसिद्ध आरोपीने पॅरोल देण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. परंतु, सर्वसाधारणपणे आपत्कालीन अथवा वैद्यकीय परिस्थितीत आरोपीला पॅरोल मंजूर केला जातो. मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था करण्याच्या आणि मुलाला परदेशी जाताना निरोप देण्याच्या कारणासाठी पॅरोल मंजूर केला जात नाही, असा दावा करून सरकारने श्रीवास्तव याच्या याचिकेला विरोध केला.

तथापि, दु:खाप्रमाणेच आनंद हीदेखील एक भावना आहे. कुटुंबीय दुःखात असेल, तर त्यात सहभागी होण्यासाठी आरोपीला पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पॅरोल मंजूर करायला हवा, असे न्यायालयाने पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे.

कारागृहातील दोषींना बाहेरील जगाशी संपर्क साधता यावा आणि कौटुंबिक सुख – दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोलवर काही काळाकरिता सशर्त सुटका करण्यात येते. शिक्षा भोगणारी किंवा तुरुंगात बंदिस्त असलेली व्यक्ती आरोपी असली तरी ती कोणाचा मुलगा, पती, वडील, भाऊ असते. त्यामुळे, न्यायालय दोषसिद्ध अथवा आरोपींच्या पॅरोल आणि फर्लोच्या अर्जांचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करते, असे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना स्पष्ट केले आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट