मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भटक्या कुत्र्या-मांजरांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई मनपाचे App

भटक्या कुत्र्या-मांजरांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई मनपाचे App

मुंबई - मुंबई मनपाच्या शहरातील भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी अधिक सक्रीयपणे काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेकडून भटक्या प्राण्यांसाठी स्वतंत्र पशुवैद्यक रुग्णालय उघडण्यात आले आहे. त्यानंतर आता पशुवैद्यकीय विभागाने कुत्रे आणि मांजरींच्या संदर्भातील तक्रारींसाठी एक मोबाइल ॲप तयार केले आहे. कुत्रा चावणे, परिसरात कुत्र्यांची संख्या वाढणे, भटके कुत्रे व मांजरींचा उपद्रव, कुत्रा व मांजरींचे लसीकरण, त्यांची नसबंदी अशा कोणत्याही तक्रारी आणि विनंती या ॲपवर करता येणार आहे. पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे (व्हीएचडी) हे ॲप स्वयंचलित असून यावर केलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याची प्रक्रिया ॲपद्वारे करण्यात येणार आहे.

अनेकदा परिसरात भटक्या श्वानांची किंवा मांजरांची संख्या वाढते, कधीकधी एखाद्या श्वानाला रेबीज झाल्याचा परिसरातील नागरिकांना संशय असतो, तर कधी कोणाचा पाळीव श्वान खूप भुंकत असतो.अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राण्यांच्या संदर्भात असतात. आतापर्यंत नागरिकांना विभाग कार्यालयात जाऊन किंवा ई – मेलवर यासंदर्भातील तक्रारी करता येत होत्या. हे ॲप सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ४० तक्रारी आल्या आहेत. तक्रार संबंधित विभाग किंवा संबंधित सामाजिक संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम या ॲपद्वारे केले जाते.

नागरिकांना तक्रारी करणे सोपे व्हावे, तसेच या तक्रारींवर वेळीच कार्यवाही करता यावी यासाठी महापालिकेच्या पशुवैद्याकीय विभागाने एक ॲप तयार केले आहे. पशुवैद्याकीय आरोग्य विभाग ( VHD) ॲप्लिकेशन असे त्याचे नाव असून महापालिकेच्या संकेतस्थळावरून या ॲपवर जाता येते.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट