मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण, मिहीर शहाची नशेत कार चालवण्याची कबुली

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण, मिहीर शहाची नशेत कार चालवण्याची कबुली

मुंबई - वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहाने अपघाताच्या वेळी स्वत: कार चालवत असल्याची कबुली बुधवारी पोलिसांना दिली आहे. तसेच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याला नकार दिलेल्या मिहीरने पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो, अशी कबुली दिली आहे. मुंबई पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

“वरळी अपघातानंतर मी आणि कुटुंबीय घाबरलो होतो. त्यामुळे मी पळालो. मुंबई पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने मद्यप्राशन केले होते, हे सिद्ध झालं आहे. एवढंच नव्हे तर त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन केलं होतं, असंही मुंबई पोलीस म्हणाले आहेत. मिहीर शाहला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडले, असे मिहीरने चौकशीदरम्यान सांगितले आहे. तसेच मिहिरने आपल्याकडे चालक परवाना असल्याचे सांगितले आहे. पण अद्याप कुटुंबियांनी त्याचा चालक परवाना पोलिसांना दिला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आली आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट