मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित

मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित

मुंबई - मराठा आरक्षणासाठी काल सरकारने बोलावलेल्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार घातला त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राजकारण तापले . हाच मुद्दा कळीचा बनवत आज सत्तारूढ आघाडीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळात घेरले. सत्तारूढ सदस्य आक्रमक होत त्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला त्यातून कामकाज आधी चार वेळा आणि मग दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

आज सकाळी विशेष सत्र पार पडले, प्रश्नोत्तराचा तास ही झाला , त्यानंतर मात्र सत्तारूढ सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना टीकेचे लक्ष करीत काल कोणाच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणावरची सर्वपक्षीय बैठक टाळली ते स्पष्ट करा , तुमचा बोलविता धनी कोण ते स्पष्ट करा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय असे सवाल करीत घेरले.

एकाबाजूला सत्तारूढ सदस्य आक्रमक होऊन जागा सोडून पुढे गेले , त्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणाबाजी सुरू केली त्यातून प्रचंड गदारोळ झाला. दुसऱ्या बाजूला विरोधी सदस्य आपल्या जागेवर शेवटपर्यंत शांत बसून होते. त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. दोन वेळा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उठून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र सत्तारूढ सदस्यांनी मोठ्याने ओरडत, घोषणा देत त्यांना बोलूच दिले नाही.

भाजपाच्या अमित साटम यांनी सभागृहात या विषयाला सुरूवात केली त्यावर आशिष शेलार, डॉ संजय कुटे , भरत गोगावले , नितेश राणे, राम कदम आदींनी आलटून पालटून सतत विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष केले. या गदारोळामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चार वेळा कामकाज तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा पुन्हा गदारोळ होतच राहिला. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९४,८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर केल्या , कोणत्याही चर्चे शिवाय गदारोळातच मागण्या मंजूर करण्यात आल्या. यातच विरोधी पक्ष काहीही न बोलता मराठा आरक्षण प्रश्नी अपमान करत आहेत, चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले देखील या प्रकरणी भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण नेमके कोणाला द्यायचं नाही हे जरांगे पाटील यांनी ओळखावं असे मंत्री विखे पाटील म्हणाले .

मंत्री शंभूराजे देसाई यांनी ही भूमिका मांडली. सर्व पक्षीय बैठकीचे निमंत्रण सर्व पक्षीय नेत्यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिलं होतं, त्यांना फोन ही केलं होतं, सर्व पक्षीय लोकांचं मत जाणून घेऊन घेऊन पुढील निर्णय घ्यायचा आहे. मात्र आपली भूमिका मांडण्याचं विरोधक टाळत आहेत. विरोधी पक्षाच्या दुटप्पी भूमिकेची नोंद जरांगे पाटील यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

दुसऱ्या बाजूला सत्तारूढ सदस्य घोषणाबाजी करत आहेत. विधान परिषदेत ही याच विषयावरून सत्तारूढ सदस्यांनी गदारोळ केला.

विधानसभेत कर विषयक कायदे सुधारणा विधेयक,

महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंध करण्यासाठी चे सुधारणा विधेयक, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध करणारे विधेयक आणि पुरवणी मागण्यांसाठी चे विनीयोजन अशी चार विधेयके मंजूर करण्यात आली. याच

गदारोळात पिठासीन अधिकारी संजय शिरसाट यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट