मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबईजवळ उभारले जाणार 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडिअम

मुंबईजवळ उभारले जाणार 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडिअम  

मुंबई - टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर मुंबईतल्या खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार केला गेला, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला मोठ्या आणि अद्ययावत स्टेडियमची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता या स्टेडियम उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे. महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आणि देशातलं दुसरं सगळ्यात मोठं स्टेडियम असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए हे स्टेडियम उभारणार आहे

मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. भारतात सध्या अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे सगळ्यात मोठं आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी एक लाख 30 हजार प्रेक्षक बसू शकतात. तर मुंबईत वानखेडे स्टेडियमची क्षमता 33 हजार आणि ब्रेबॉर्न स्टेडियमची क्षमता 20 हजार एवढी आहे. तर नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये एकावेळी 45 हजार प्रेक्षक बसू शकतात.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट