मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ

रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ

मुंबई, -: देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना आज मंजुरी दिली आहे.

सागरी महाविद्यालयाला 500 ते 600 कोटी तसेच विधी महाविद्यालयाला 25 कोटी खर्च येणार आहे. त्यालाही तत्वत: मान्याता देण्यात आली आहे. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे. त्यासाठी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचेही ते म्हणाले.

या भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येईल. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन आदी विषयांचा अभ्यास करता येईल.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट