मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सचिनभाऊ अहिर यांनी देशपातळीवर ऊभा केलेला बंद एनटीसी मिलचा लढा यशस्वी करा!

सचिनभाऊ अहिर यांनी देशपातळीवर ऊभा केलेला बंद एनटीसी मिलचा लढा यशस्वी करा! 

     मुंबई दि.३:बंद एनटीसी मिल मधील कामगारांचा‌ थकीत पगार मिळवून देण्यासाठी जो लढा उभा केला गेला,तसाच लढा अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी देशपातळीवरील बंद २३ एनटीसी मिल प्रश्नावर ऊभा केला आहे,तो‌ यशस्वी करा,असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना केले आहे. 

     एनटीसी मिल कामगारांना कोविड बंदच्या काळातील थकीत १०० टक्के वेतन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते या नेतृत्वाने मिळवून दिले.त्या प्रित्यर्थ काळाचौकी येथील इ़.यु.मिल क्र.५ कामगारांच्या वतीने कृतज्ञ सोहळा पार पडला.या सोहळ्यात गोविंदराव मोहिते आपल्या सत्काराला उत्तर देत होते. 

     संघटनेने मैदानातील लढ्या बरोबरच न्यायालयात झगडून हा १०० टक्के थकीत पगार कामगारांना मळवून‌ दिला.त्या बद्दल कामगारांच्या वतीने हा सोळाळा पार पडला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक संदीप शर्मा होते. 

  या प्रश्नावर संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे आदींनी नेतृत्वाला साथ‌‌ दिली,त्या बद्दल त्यांचाही कामगारांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

 ‌‌    मिल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या पर्सनल मॅनेजर दीपक शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी संघटनेच्या संघटन सेक्रेटरीपदी मिलचे प्रतिनीधी गजानन कदम यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचाही कामगारांच्या वतीने सन्मान करण्यात आला्.

    सत्काराला उत्तर देताना सरचिटणीस गोविंदराव मोहिते पुढे म्हणाले,कामगारांनी नेतृत्वामागे एकजूट उभी केल्याने या  प्रश्नावर यश मिळविता आले आहे.गिरणी कामगारांच्या घरांच्या हक्कासाठी जे‌ आंदोलन उभे राहिल,त्या मागे‌‌ही कामगारांनी एकजुटीने उभे राहिले‌ पाहिजे.या प्रसंगी  एम.पी‌.पाटील,साई निकम, नामदेव झे़ंडे, सर्व संघटन सेक्रेटरी आदी उपस्थित होते.



रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट