मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देशातील पहिल्या AI विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सायमन मॅक

देशातील पहिल्या AI विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सायमन मॅक  

मुंबई, - भारतातील पहिले AI विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध झालेले रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे स्थित युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने Universal AI University सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ. सायमन मॅक यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद यांनी या नियुक्तीची घोषणा केली. एखाद्या परदेशी, विशेषतः अमेरिकेन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकाची भारतीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक होण्याची ही पहिलीच घटना असून याद्वारे अमेरिकन विद्यापीठाच्या दर्जाचा वैश्विक अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठात प्रथमच सुरू होत आहे.

डॉ. सायमन मॅक यांचे कुलगुरूपदी स्वागत करताना युनिव्हर्सल ए आय् युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद म्हणाले, “भारतीय विद्यापीठीय शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी नागरिक कुलगुरू म्हणून नेमले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. डाॅ. मॅक यांच्या अमेरिकेतील शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीतील अनुभवांचा विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम घडविण्यात उपयोग होईल आणि त्याद्वारे येथील विद्यार्थी परदेशी न जाता मायदेशीच आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील”.

युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलगुरूपद स्वीकारताना डॉ. सायमन मॅक म्हणाले, “युनिव्हर्सल ए आय् युनिव्हर्सिटीने कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाशी संबंधित अभ्यासक्रम योजून पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर असताना जगभरातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि स्टार्टअप्सचे नेतृत्व करण्यासाठी युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिभावान तरुण उद्यमी नेतृत्व, कार्यकुशल व्यवस्थापक निर्माण करण्यासाठी जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम निर्माण करण्यावर आमचा भर असेल”.

डॉ. मॅक यांनी यापूर्वी कारुथ इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिपचे कार्यकारी संचालक आणि एसएमयू कॉक्स स्कूल ऑफ बिझनेसच्या रणनीती, उद्योजकता आणि व्यवसाय अर्थशास्त्र विभागात प्रॅक्टिसचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी एमआयटी, यूएसए मधून बी.टेक पदवी प्राप्त केली तर एसएमयू कॉक्स स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि पीएच.डी. पूर्ण केले.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट