मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विचार, विश्वास आणि विकास हीच सरकारची त्रिसूत्री

विचार, विश्वास आणि विकास हीच सरकारची त्रिसूत्री  

मुंबई -: विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आमचे सकारात्मक कामातून उत्तर असेल , आम्ही जनतेच्या दारात जाऊन शासन चालवलं आहे, वेगवान निर्णय घेतले यासाठी विचार , विश्वास आणि विकास ही आमची त्रिसूत्री आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते.

विरोधक पूर्वी बाहेरून सरकारला शिव्या देत होते , आता सभागृहात देऊ लागले आहेत, हे दुर्दैव आहे असं ते म्हणाले. विरोधकांनी आपल्याच राज्याची बदनामी करू नये, इथले उद्योग राज्याबाहेर गेलेले नाहीत , गेल्या दोन वर्षांत एकूण २४२ मोठे उद्योग राज्यात येत आहेत. एकूण दोन लाख हजारांहून अधिक ची गुंतवणूक राज्यात होते आहे त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होत आहे असं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून सरकारने माहेरचा आहेर दिला आहे. एक जुलै पासून ही योजना लागू करण्यात आली आहे, अर्जदार केव्हाही या योजनेत सहभागी झाला तरी त्याला पूर्वलक्षी प्रभावाने पैसे देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. यासाठी लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ असं केलं आहे आणि जमिनीची अट ही काढून टाकली आहे असं ते म्हणाले.मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी सरकार देत आहे, त्यांची फी सरकार भरणार आहे. तरुणांनाही दहा हजार महिना प्रशिक्षण रक्कम दिली जाणार आहे, यासाठी आवश्यक निधी उभारला जाईल , इच्छा असेल तर मार्ग निघतो असं मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट