मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आयुक्तांकडून दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची पाहणी

आयुक्तांकडून दादर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची पाहणी   

मुंबई -: मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.

या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला  (दि.१ जुलै ) दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली.

मुंबई महानगरातील पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना माननीय उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार, अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासनाला वेग द्यावा, आत्यंतिक वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहने हटवावीत, जेणेकरुन नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पोलीस प्रशासनासमवेत नुकतीच बैठक देखील पार पडली. त्यानंतर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाले निष्कासन कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे. 

मुंबई महानगरातील आत्यंतिक वर्दळीचा परिसर म्हणून दादरची ओळख आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातून अनधिकृत फेरीवाले हटवल्यानंतर नागरिकांनी त्याचे स्वागत केले होते. या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी आज दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली. 

श्री. गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग / गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग इत्यादी सर्व परिसरांमध्ये पायी फिरुन पाहणी केली. अनधिकृत फेरीवाल्यांवरील निष्कासनाची कारवाई सुरु ठेवावी, वीजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडीत कराव्यात, रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करुन परिसर स्वच्छ ठेवावा, इत्यादी निर्देश देत त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचीही सूचना केली. त्याचप्रमाणे, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करुन घेण्याचीही सूचना महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी केली.

या पाहणीप्रसंगी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजीतकुमार आंबी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (छत्रपती शिवाजी महाराज मैदान पोलीस स्थानक) श्री. मुरकुटे यांचेसह महानगरपालिकेचे तसेच दादर पोलीस स्थानकातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट