मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा रस्ता गेला वाहून

करुळ घाटातील संरक्षक भिंतीसह कॉंक्रीटचा रस्ता गेला वाहून  

सिंधुदुर्ग - :दुपदरीकरणासह कॉंक्रीटीकरण सुरु असलेल्या करुळ घाटातील नव्याने बांधलेली संरक्षक भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ताच पावसात वाहून गेला आहे. तसेच संपूर्ण घाटमार्गावर दरडीच दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या घाटमार्गाने वाहतुक सुरु होण्याची शक्यता धुसर बनली आहे. नव्याने बांधलेली भिंत आणि कॉंक्रीटचा रस्ता वाहून गेल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे.

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटमार्गाचे दुपदरीकरण आणि कॉंक्रीटीकरणासाठी २२ जानेवारीपासून मार्ग वाहतुकीस बंद आहे. ९.६ किलोमीटरच्या घाटमार्गापैकी सहा किलोमीटर लांबीचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. तर संरक्षक भिंतीचे कामही करण्यात आले आहे. उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करुन १ जुलैनंतर घाटमार्ग सुरु होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांना होती. परंतु, सर्वांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.

करुळ घाटरस्त्याला नव्याने बांधलेली संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याने कोसळली आहे. केवळ भिंतच कोसळली नाही तर नव्याने कॉंक्रीटीकरण केलेला निम्मा रस्ताच वाहून गेला आहे. ५० मीटर लांबीची भिंत कोसळली असून तितकाच रस्ताही वाहून गेला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, संपूर्ण घाटमार्गात दरडीच दरडी कोसळल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच कॉंक्रीटचा नवीन रस्ता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वाहून गेला आहे. त्यामुळे करुळ घाटमार्गाने या पावसाळ्यात वाहतूक सुरु होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाण्यामुळे संरक्षक भिंत कोसळली आहे. ही भिंत नव्याने बांधण्यास ठेकेदाराने सुरुवात केली आहे. रस्ताही नव्याने करण्यात येत आहे. करुळ घाट रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी सहा महिन्यापासून हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. परंतु या अत्यंत निकृष्ट कामामुळेच संरक्षक भिंत कोसळून रस्ताच वाहून गेला आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट