मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

लोणावळा -: लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरल आहे. त्यातच आज रविवार असल्याने पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. आप्ताकालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनस्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं. येथूनच अन्सारी कुटुंबातील पाचजण वाहून गेले. मृत्यू झालेल्यांमध्ये 36 वर्षीय महिला, 13 वर्ष, 8 वर्ष, 4 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

लोणावळ्यात गेल्या 24 तासांत 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर लवकर दाखल झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. आता लोणावळ्यात पावसाचं पुनरागमन झाल्याने भुशी धरणही लवकरचं भरण्याची अपेक्षा आहे.


रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट