मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल

लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल

सोलापूर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर ऊर्फ शेखर  देशपांडे यांच्यावर आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. आता जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले असून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. 

अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. लिपिक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तसह लिपिक फरार झाले आहेत. 

स्वीय सहाय्यकाकडे सापडलं मोठं घबाड

त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 93 हजार रूपये रोख रक्कम, साडे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळून आली आहेत. ही मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे आढळली आहेत. तसेच बीड जिल्ह्यात देखील शेत जमीन खरेदी केल्याचे दिसून येत आहे. तसेच एक चारचाकी वाहन, दोन इलेक्ट्रॉनिक मोपेड मोटार सायकल, दोन मोटार सायकलही आढळून आल्या आहेत. 

जावळेंच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल

लाच प्रकरणात फरार असलेले अहमदनगरचे आयुक्त पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल झाले.  सोलापुरातील विद्या नगर परिसरात पंकज जावळे यांचे घर असून मागील चार वर्षांपासून इथे कोणीही राहायला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  पंकज जावळे हे अहमदनगर आयुक्त होण्यापूर्वी सोलापुरात जिल्हा प्रशासन अधिकारी उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी विज्ञानगर येथे पंकज जावळे यांचे घर होते. याच घरात एसीबी पथककडून चौकशी सुरु करण्यात आली. सोलापूर एसीबी विभागाचे 7 ते 8 अधिकारी, कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले. या घरात घरगुती साहित्याशिवाय काहीही आढळून आलेले नाही, घर मात्र जावळे यांच्या मालकीचे आहे.  या संदर्भात आम्ही अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती एसीबीचे उपधीक्षक गणेश कुंभार यांनी दिली. 

जावळेंवरील कारवाईनंतर महापालिकेसमोर फोडले फटाके

दरम्यान, पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेसमोर एकमेकांना पेढे भरवून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. आयुक्त पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम व्यावसायिकांना त्रास दिला जातं असल्याचा आरोप होत आहे. 5-5 महिने कोणताही बांधकाम परवाना जाणून-बुजून देण्यात येत नव्हता. कारवाई झाल्यामुळे खरंच न्याय मिळाला, अशी भावना बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट