मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विद्युत कर्मचारी ९ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार

महाराष्ट्रातील ८७ हजार विज कामगारांची पगारवाढीच्या मागणी करीता सरकार व वीज कंपन्यांच्या प्रशासनाच्या विरोधात राज्यभर तीव्र निदर्शने

चर्चा करून पगारवाढीचा करार न केल्यास विद्युत कर्मचारी ९ जुलै पासून बेमुदत संपावर जाणार

      महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंता, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने शुक्रवार दि.२८.०६.२०२४ रोजी वीज कंपन्यातील ८७ हजार वीज कामगार यांच्या प्रलंबित पगारवाढ प्रश्नावर मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री तसेच मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिनांक ०७.०६.२०२४ रोजी दिली होती.आदोलनाच्या नोटीस नंतर मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव ऊर्जा यांच्या बरोबर कामगार संघटनांची दि.२६.०६. २०२४ रोजी वाटाघाटी झाल्या.वाटाघाटी मा.अभा शुक्ला अप्पर मुख्य सचिव ऊर्जा यांनी संघटनांची भूमिका ऐकून घेतली व त्यांनी स्पष्ट सांगितले की, पगारवाढीच्या अंतिम वाटाघाटी ह्या मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या पातळीवर यापूर्वी झाल्या असल्यामुळे मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही.कृती समितीचे म्हणणे मी ऊर्जामंत्री त्यांच्या समोर मांडून लवकरच बैठक आयोजित करतो असे आश्वासन दिले व कामगार संघटना संयुक्त कृती समितील नियोजित आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

        मा.अप्पर मुख्य सचिव ऊर्जा यांच्या पातळीवर झालेल्या पगारावर वाटाघाटी मध्ये कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे कृती समितीने आयोजित केलेले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाचा दुसरा टप्पा दि.२८.०६.२०२४ रोजी महाराष्ट्रभर हजारो कामगार,अभियंते,अधिकारी, सहाय्यक कामगारांनी निर्मिती,पारेषण व वितरण वीज कंपन्यांचे झोन कार्यालया समोर व वीज निर्मिती केंद्रासमोर जोरदार निदर्शने करून सरकार व प्रशासनाचा निषेध केला.आंदोलनाचा तिसरा टप्पा दिनांक ९ जुलैला २०२४ एक दिवसाचा लाक्षणिक संप असून तोपर्यंत पगारवाढीचा निर्णय अंतिम नाव झाल्यास बेमुदत संपाचा जाण्याचा निर्णय कृती समितीने यापूर्वी शासन व प्रशासनात कळविलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून वीज कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न सोडवावा असे आव्हान विद्युत कर्मचारी,अभियंता,अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.सहा संघटनेच्या पाठीमागे हजारो कामगारांनी जी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्व कामगारांचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.


आपले विश्वासू

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंता,अधिकारी संयुक्त कृती समिती

आंदोलनात सहभागी संघटना

१) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक)

२) महाराष्ट्र वीज कामगार महासंघ (बि.एम.एस)

३) सबॉडीनेट इंजिनियर्स असोसिएशन

४) विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन

५) महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विघुत कर्मचारी संघटन

६) महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉग्रेस (इंटक)

वीज कामगार संयुक्त कृती समितीचा विजय असो.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट