मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कोव्हिड लसीकरणाविषयीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नवी मुंबई ः सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुसर्‍या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणार्‍या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांना लसीकरणाविषयीची माहिती अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावी अशा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या हींींिी://ुुु.पाालर्लेींळवलरीश.लेा या विशेष पोर्टलवर कोव्हीड 19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आता नागरिक या वेबसाईटवरील कोव्हिड 19 तअउउखछअढखजछ या सेक्शनवर क्लिक करून महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात व त्यानुसार आपल्या लसीकरणाचे नियोजन करू शकतात. विशेष म्हणजे नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दररोज संध्याकाळी 7 वा. दुसर्‍या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार असून नागरिक पोर्टलला भेट देऊन त्यानुसार आपल्या लसीकरणाचे सुलभपणे नियोजन करू शकतात. या पोर्टलवरून यापूर्वीच महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्टींग केंद्रांवर केलेल्या कोव्हीड टेस्ट्सचा रिपोर्ट कोव्हिड 19 तअउउखछअढखजछ  सेक्शनमध्ये सहजपणे उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्याच पोर्टलवर आता दररोजच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती एका क्लिकव्दारे समजणार असल्याने नागरिकांना हे अत्यंत सुविधाजनक होणार आहे. नागरिक अगदी आपल्या हातातील मोबाईलवरूनही लसीकरणाविषयीची माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात.  

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट