मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

56 क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षकांचे लसीकरण

नवी मुंबई ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांच्या संयुक्त विदयमाने ‘ऑलिम्पिक डे’ च्या निमित्ताने भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

राज्यातील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोव्हीड लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबईतील राज्य, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आकांक्षा बरजे, जोयल जॉन, तेजस कदम, मदन झा, शक्तीसिंग यादव, रिध्दी शेट्टी, यशमिता म्हात्रे, नागेश राजभर, सचिन ठाकूर, विघ्नेश मोहन, इशिता सुर्वे अशा 11 राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविलेल्या खेळाडूंसह राज्यस्तरावरील 32 खेळाडूंनी लसीकरणाचा लाभ घेतला. अशाप्रकारे 43 खेळाडूंसह खेळाडूंना प्रशिक्षण देणारे 13 क्रीडा प्रशिक्षक अशा एकूण 56 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट