मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ऐरोलीत उभारणार मराठी भाषा भवन उपकेंद्र

भूखंडाचे सिडकोकडून राज्य शासनाकडे हस्तांतरण

नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या उभारणीकरिता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाला देण्यात आलेल्या, नवी मुंबईतील ऐरोली येथील भूखंडाचे 13 जुलै 2021 रोजी मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या अधिकार्‍यांतर्फे हस्तांतरण करण्यात आले. यामुळे प्रस्तावित मराठी भाषा भवन उपकेंद्रामुळे संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. 

मराठी भाषा विकास व संवर्धनाकरिता कार्यरत असणार्‍या भाषा संचलनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून त्यामध्ये एकसूत्रता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 2016 मध्ये सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली होती. त्यानुसार, सिडकोकडून ऐरोली येथील सेक्टर-13 मधील भूखंड क्र. 6अ हा अंदाजे 3000 चौ.मी. चा भूखंड मराठी भाषा भवन उपकेंद्राकरिता निश्चित करण्यात येऊन, दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने या भूखंडाचा ताबा राज्य शासनाला देण्यात आला. त्याचप्रमाणे इमारतीची उभारणी करण्याची जबाबदारी शासनातर्फे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास देण्यात आली आहे अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. सदर भुखंडाच्या हस्तांतरणावेळी देसाई यांनी सदर भूखंडाची पाहणी केली. मराठी भाषा भवन उपकेंद्राची इमारत ही बहुउद्देशीय सामाईक सुविधांनी युक्त असणार आहे. या इमारतीत ग्रंथालय, बैठकांसाठी बहुउद्देशीय सभागृह यांसह भाषाविषयक विविध उपक्रमांची कार्यालये व अध्यक्षांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था असणार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रसंगी मिलिंद गवादे, सहसचिव, मराठी भाषा विभाग,  एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको,अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थापक (वसाहत) सिडको, प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको, बी. डी. राठोड, सहाय्यक भूमापन अधिकारी, सिडको तथा सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट