मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

साडे चार लाख उकळणार्‍या भोंदु बाबाला अटक

नवी मुंबई : प्रियकराला वश करण्यासाठी प्रेयसीकडून लाखो रुपये उकळणार्‍या भोंदू बाबाला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. या गुन्ह्याची उकल करणे कठीण असताना खबरी आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली. त्याने अनेकांची फसवणुक केल्याची शक्यता असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

वासिम रइस खान ऊर्फ बाबा कबिर खान बंगाली असे अटक आरोपीचे नाव आहे. खारघर येथे राहणार्‍या 24 वर्षीय युवतीचे सहा महिन्यांपूर्वी प्रियकराचे वाद झाल्याने त्यांच्यातील संपर्क तुटला होता. मात्र प्रियकर प्रतिसाद देत नसल्याने तिला नैराश्य आले होते. दरम्यान लोकलमधील भोंदू बाबची जाहिरात वाचून तिने संपर्क केला. आरोपीने तिला विश्वास दिल्यानंतर चार महिन्यांत एकूण 4 लाख 57 हजार रुपये आरोपीने उकळले. विशेष म्हणजे ही युवती उच्चशिक्षित होती तर आरोपीशी एकदाही भेटली नव्हती.

विविध पूजा, बळी सांगून अधिकचे पैसे आरोपी मागत असल्याने आपली फसगत होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने आरोपीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यावर तुला काळी जादू करून अपघात घडवेन अशी धमकी दिल्यावर या युवतीने खारघर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणूक व महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी कृत्य प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम अन्वये गुन्हा नोंद केला होता, खारघर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांचा समांतर तपास सुरू होता. पीडित युवतीने ज्या बँक खात्यात पैसे टाकले, त्याची ओळख, मोबाइल लोकेशन तपासणी मोबाइल क्रमांक इतिहास (सीडीआर), वेगवेगळे गूगल पे क्रमांक आदींची सखोल माहिती मिळवली. हा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना हा आरोपी मीरा  रोड परिसरात असून गोविंदनगर येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी पथकाने दिवसभर सापळा लाऊन रात्री उशिरा वसिम रईस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यााची कबुली देताच त्याला अटक करण्यात आले. आरोपी हा मूळ मेरठ उत्तर प्रदेश येथील असून 2013 मध्ये मुंबईत आला. तेव्हापासून अशी फसवणूक करत होता. त्याने याद्वारे अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट