मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

तपासणी व उपचारांती सर्व्हिकल कॅन्सर बरा होऊ शकतो

कार्सिनोमा ऑफ युटेरीन सर्व्हिक्स’, म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर’ - गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग - हा भारतातील स्त्रियांसमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. जगात सर्व्हिकल कॅन्सर’ मुळे जितक्या स्त्रियांचे मृत्यू होतात, त्यांपैकी 15.2 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात, असे काही अहवालांमध्ये नमूद आहे. याचा अर्थ, दर आठ मिनिटांनी एक महिला या रोगाला बळी पडते. या कर्करोगाला प्रतिबंध करता येतो व उपचारही उपलब्ध आहेत, तरीही ही परिस्थिती आहे. भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात जास्त आढळणारा सर्व्हिकल कॅन्सर’ हा रोग आहे. या रोगाने ग्रस्त असलेल्या महिलांची संख्या मोठी असली, तरी हा रोग टाळण्याचे व तो झाल्याचे लवकर आढळल्यास त्यावर यशस्वी उपचारांचे मार्गही अस्तित्वात आहेत. अशावेळी, एचपीव्ही लसी’विषयीची जनजागृती आणि आरोग्य व स्वच्छता यांची काळजी घेऊन नियमित वैद्यकीय चाचण्या करून घेण्यास प्रोत्साहन देणे, ही महत्वाची पावले उचलण्याची गरज आहे.

गर्भाशयाची खालची बाजू योनीशी जोडली जाते, त्या भागास ‘सर्विक्स’ असे म्हणतात. तेथील पेशींमध्ये होणार्‍या कर्करोगास ‘सर्व्हिकल कॅन्सर’ म्हणतात. प्रामुख्याने, ‘सर्व्हिकल कॅन्सर’ हा ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ च्या (एचपीव्ही) संक्रमणामुळे होतो. ‘एचपीव्ही विषाणू’ हा ‘सर्व्हिकल डिस्प्लेशिया’ किंवा ‘सर्व्हिकल पेशीं’च्या असामान्य वाढीस कारणीभूत ठरतो.

‘एचपीव्ही’ च्या संसर्गाशिवाय, ‘सर्व्हिकल कॅन्सर’च्या उत्पत्तीशी संबंधित इतरही अनेक कारणे आहेत, उदा. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, एकाहून अधिक लैंगिक भागीदार, धूम्रपान, गर्भनिरोधकांचा दीर्घकालीन वापर, लहान वयात गर्भधारणा किंवा अनेक वेळा गर्भधारणा, इत्यादी. लैंगिकदृष्ट्या सक्रिय असणार्‍या प्रौढांपैकी 70 टक्के जणांना, ‘एचपीव्ही’ विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो, असे आकडेवारी सांगते. या विषाणूचे असंख्य प्रकार आहेत. यातील अनेकांच्या संसर्गाचे निराकरण करणे सोपे आहे आणि या विषाणूमुळे कर्करोग होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 1 टक्का किंवा त्याहूनही कमी आहे.

‘सर्व्हिकल कॅन्सर’ ची तपासणी - सर्व्हिकल कॅन्सर शोधण्यासाठी सर्वात प्रथम करण्याजोगी गोष्ट म्हणजे नियमित तपासणीसाठी क्लिनिकला भेट देणे आणि एचपीव्ही’ पासून बचाव करण्यासाठी लसदेखील घेणे. ‘सर्व्हिकल कॅन्सर’ रोखण्यासाठी किंवा प्रारंभिक टप्प्यावर त्याचा शोध घेण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात.

‘पॅप टेस्ट’ या चाचणीस ‘पॅप स्मीयर’ असेही म्हणतात - ‘पापानीकोलाऊ चाचणी’ किंवा ‘पॅप स्मीयर’ या चाचणीतून ‘सर्व्हिक्स’वरील कर्करोग-पूर्व पेशींचे अस्तित्व किंवा पेशींमधील बदल शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेळेवर उपचार न घेतल्यास या पेशींमुळे ‘सर्व्हिकल कॅन्सर’ होऊ शकतो.

एचपीव्ही चाचणी - या चाचणीतून ‘पॅपिलोमाव्हायरस’ची उपस्थिती लक्षात येते. या विषाणूमुळे पेशींमध्ये बदल होऊ शकतो आणि त्यांचे रुपांतर कर्करोगाच्या पेशींमध्ये होऊ शकते. स्त्रियांनी वयाच्या 21व्या वर्षापासून पॅप चाचणी करून घ्यावी, अशी शिफारस केली जाते. पहिल्या चाचणीचे निष्कर्ष सामान्य असतील, तर दुसर्‍या चाचणीसाठी क्लिनिकला जाण्यापूर्वी महिला आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करू शकतात.

लवकर निदान होणे महत्वाचे - सर्व्हिकल कॅन्सर वर उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच, सामान्य लक्षणे आणि चिन्हे यांच्याद्वारे तो लवकर ओळखला जाणे महत्वाचे आहे. असामान्यपणे किंवा अनियमित स्वरुपात योनीतून रक्तस्त्राव किंवा लैंगिक संभोगानंतर वा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव; योनीतून येणारा नेहमीपेक्षा वेगळा स्त्राव, आणि संभोगादरम्यान होणार्‍या वेदना, मासिक पाळीशी संबंधित नसणार्‍या पेल्विक वेदना अशी ही लक्षणे असतात. आरोग्याच्या इतर समस्यांशीदेखील ही लक्षणे संबंधित असू शकतात. म्हणूनच, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आपल्या शरीरात काय घडत आहे, याविषयी अधिक माहिती मिळविणे नेहमीच चांगले.

सर्व्हिकल कॅन्सर वर उपचार - सर्व्हिकल कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे, यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. ‘सर्व्हिकल कॅन्सर’च्या उपचारांमध्ये ‘केमोथेरपी’, ‘रेडिएशन थेरपी’ आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. कार्सिनोमा ऑफ युटेरीन ‘सर्व्हिक्स’ची तीव्रता व गांभीर्य लक्षात घेऊन त्यावरील उपचारांची एकल किंवा संयुक्त पद्धत ठरविली जाते. ‘एचपीव्ही लसी’ द्वारे प्रतिबंध - सर्व्हिकल कॅन्सर रोखण्याचा एक सिद्ध मार्ग म्हणजे ‘एचपीव्ही’वर लस घेणे. कोणत्याही लैंगिक संपर्कापूर्वी लहान वयातच लस घेणे चांगले. ही लस 10 ते 26 वयोगटातील स्त्रियांसाठी आहे आणि 46 वर्षे वयापर्यंत ती दिली जाऊ शकते. ‘सर्व्हिकल कॅन्सर’ प्रतिबंधात्मक आहे आणि तो बरा होऊ शकतो. तो उद्भवण्यापूर्वीच त्याचा इलाज करूयात.

- डॉ. रिचा बन्सल, सल्लागार, स्त्रीरोग ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट