आरोग्य सेवेसाठी पनवेल पालिकेकडून नवे धोरण

आरोग्यसेवांत वाढ; 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह माताबाल रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुर

पनवेल : पालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पनवेल महापालिकेने आरोग्य सेवेसाठी धोरण बनवून पहिले पाऊल टाकले आहे. गुरुवारी झालेल्या सर्वासाधारण सभेत नऊ आरोग्य केंद्र व 100 खाटांचे माता बाल रुग्णालय सुरु करण्याविषयी चर्चा करुन त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 

पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 18) सकाळी 11.30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाईन झाली. यावेळी पनवेलकरांसाठी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पालिकेने प्रस्ताव बनवले होते. त्यावर सकारात्मक सविस्तक चर्चा करण्यात आली. पालिका क्षेत्रात नव्याने नऊ प्राथिमक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार असून जुन्या सहा केंद्रही सक्षम करण्यात येणार आहेत.  पालिकेच्या नव्या आरोग्य धोरणामुळे समारे 12 लाख लोकवस्ती असलेल्या पालिका हद्द्ीत भविष्यात 15 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राांतून आरोग्य सुविधा मिळणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमानुसार पालिका  क्षेत्रात प्रति 50 हजार लोकसंख्येमागे एक नागरी आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. मात्र पनवेल पालिका क्षेत्रात फक्त सहा आरोग्य केंद्र सुरू आहेत. यात पनवेल शहरात दोन, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर आणि कामोठे येथे  आरोग्य केंद्र असून तेथेही रुग्णसंख्या अधिक आणि मनुष्यबळ कमी ही स्थिती आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सरकारी दवाखाने व रुग्णालयांचा अभाव असल्याने सामान्य पनवेलकरांनी आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. 

पालिका प्रशासनाने करोना संकटाशी दोन हात सुरू असताना  पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नव आरोग्य धोरण होती घेतले असून त्याचे प्रस्ताव मंजुर केले आहेत. पालिका क्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य सोयींनी युक्त असे 100 खाटांचे माता बाल संगोपन व बाल आरोग्य केंद्र उभारण्यास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 100 खाटांचे माता संगोपन व बाल-आरोग्य केंद्र उभारणे-सेक्टर 18-प मधील प्लॉट क्रमांक 8 अ, 8ब , क्षेत्र 8 हजार चौरस मीटर (2 एकर) यामध्ये 5600 चौरस मीटर बांधकाम करण्यात येईल त्यासाठी 19 कोटी 60 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली. पालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कामोठ्यात दोन आरोग्य केंद्रे
 पालिकेच्या नव्या आरोग्य धोरणानुसार तक्का, खांदा कॉलनी, पोदी, तळोजा मजकूर, धानसर, तुर्भे, नागझरी व तोंडरे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचे नियोजन आहे. 
 कामोठे येथे एक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी आणखी एक केंद्र करण्यात येणार आहे. पालिकेने दर्शविलेल्या लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक रुग्णांचा भार हा येथील केंद्रावर असून येथील लोकसंख्या 2,32,624 इतकी आहे. 
 तसेच कामोठे येथील केंद्रावर आधारित लोकसंख्या 184,857 तर पोदी येथील केंद्रावरील अंदाजित लोकसंख्या 1,52,774 एवढी आहे. ग्रामीण भागांमध्ये आरोग्य केंद्र सूरु झाल्यास खरर्‍या अर्थाने पालिकेची आरोग्य सेवा गावागावांमध्ये पोहचणार आहे.
माताबाल रुग्णालयासाठी 19 कोटी 60 लाखांचा प्रस्ताव
 नवीन पनवेल वसाहतीत सेक्टर 18 मधील 2 एकर जागेवर 5,600 चौरस मीटरवर जागेवर शंभर खाटांचे माताबाल रुग्णालय उभारण्यासाठी 19 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.  
शाळांचे हस्तांतरण
मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा पालिकेत समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  315 शिक्षकांच्या पगाराच्या खर्चावरुन 4 वर्ष रखडलेला हा विषय गुरुवारी झालेल्या  सर्वसाधारण सभेत मार्गी लागला आहे. 

पालिका हद्दीतील कळंबोली, धरणा गाव, नावडे, काळुंद्रे, आडिवली व घोट गाव येथे जलकुंभ बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडलेली मृत सफाई कामगारच्या पगारासंबंधीची लक्षवेधी चर्चेला न घेता त्यासंबंधी माहिती घेऊन संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट