मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

धार्मिकता आणि निर्बुध्दता

संजयकुमार सुर्वे

पत्रकार दिनाच्या औचित्याने आयोजित परिसंवादात गिरीश कुबेरजींनी आपल्या विचारांचा खजिना रिता केला. महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक परंपरेची आठवण उपस्थितांना करून देऊन आज समाज कसा वागत आहे याची जाणीव करून दिली. देशातील सध्याच्या सामाजिक वातावरणावर कटाक्ष टाकताना धार्मिक माणूस हा निर्बुद्ध असतो असे धाडसी विधान केले. हे विधान समाजसुधारक आगरकरांचे असल्याचे त्यांनी सांगितले आणि जर कोणाला या विधानाबद्दल आक्षेप असतील तर ते आगरकरांवर घ्यावे हेही सांगण्यास ते विसरले नाहीत. खरंच कुबेरजींनी विद्यमान काळाबाबत केलेल्या विधानात तथ्य आहे का ? याचा जर सांगोपांग विचार आताच्या देशातील आव्हानात्मक परिस्थितीशी जोडून केला तर त्यात निश्‍चितच वास्तव आहे. आगरकरांच्या या वस्तुनिष्ठ विचारांचे स्मरण पत्रकार दिनानिमित्त का होईना गिरीशजींनी करून दिले म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे.   

बुद्ध हा शब्द निश्‍चितच वैचारिक प्रगल्भतेशी आणि मनुष्यत्वाच्या उत्कर्षाशी जोडला असून ज्याने बोधित्व प्राप्त केले तो खरा बुद्ध असे आतापर्यंत समजले जात होते. बोधित्व म्हणजे काय याची संकल्पना निरनिराळ्या काळात निरनिराळी असू शकते शिवाय ती व्यक्ती सापेक्षही असू शकते. सध्याच्या युगात व्हॉट्सअप विद्यापीठातून मिळत असलेल्या ज्ञानामुळे बोधित्व प्राप्त झालेले अनेक बुद्ध पावलो पावली पाहायला मिळत आहेत. पण कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेल्या बोधित्वाचा कशाही रीतीने बुद्धत्वाशी संबंध जोडावा हा ज्याचा त्याचा हक्क असून लोकशाहीत तो प्रमाण मानला पाहिजे. अशा प्राप्त झालेल्या बोधिसत्वांचा आणि त्यांच्या बुद्धत्वाचा समाजाच्या उत्थानाशी काडीचाही संबंध नसतो. पुन्हा हे तथाकथित बोधिसत्व गुलामगिरीच्या निर्बुध्दत्वाकडे स्वतःही जातील आणि समाजालाही ढकलतील काय अशी अनामिक भीती वाटते ती अनाठायी नाही हे तितकेच खरे आहे. 

 ‘धर्म’ आणि ‘निर्बुधित्व’ या दोन अगदी वेगवेगळ्या बाबी आहेत. परंतु दोहोंच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. व्यवहारात मात्र त्या फरकाकडे आपण दुर्लक्षच करतो. माणसाच्या वृत्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हेच, धर्म काय अथवा अध्यात्म काय, यांचे आद्य उद्दिष्ट. बेलगाम मनावर संस्कार घडवून ते नीतिमान बनवणे, हाच या व्रतवैकल्यांचा गाभा हेतू. परंतु, त्या हेतूचे विसर्जन होऊन ज्या वेळी साधन-सायासांची निव्वळ कवायत केली जाते, त्या वेळी धर्माचरणाला स्वरूप प्राप्त होते ते पोकळ कर्मकांडांचे. अशा कर्मकांडांतून वाढतो केवळ निर्बुद्धिवाद. 

धर्म म्हणजे काय तर निसर्गाच्या नियमानुसार आचरण आणि व्यवहार अंगीकारणे. त्यातूनच पुढे धर्म आचरणाची पद्धत निर्माण केली गेली, कालांतराने त्यात बदल करण्यात आले. पण सध्याच्या धर्माची परिभाषाच निसर्गाच्या नियमांच्या भिन्न आहे. धर्माला म्हणजेच निसर्गालाच ग्रंथांच्या चौकटीत बंदी करून आम्ही घालून दिलेल्या नियमानुसार आचरण करावे हि संकल्पना राबवली गेली आणि समाज निर्बुद्धतेच्या खाईत ढकलला गेला. राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन वेगवेगळ्या संस्था असून निरंकुश राजसत्तेला धर्माचा मार्ग दाखवणे ही धर्मसत्तेची जबाबदारी त्यावेळी मानली गेली. पण हे कार्य धर्मसत्तेने यथासांग पार पडले का? याचा विचार केल्यास उत्तर नाही असेच मिळेल. त्यामुळे, अनेक शतके या मानव निर्मित धर्माशी लढा दिल्यानंतर सध्या अनेक सकारात्मक बदल या धर्मात झालेले पाहायला मिळत आहेत. समाजाला शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने नवं पिढी विचार करू लागली, धर्म-अधर्म यातील फरक जाणवू लागल्याने राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघांनाही प्रश्‍न विचारू लागली. त्यामुळे देशाला परिवर्तनाच्या पहाटेची चाहुल लागली. सध्या या बदलांना विरोध करून पुन्हा धर्माधिष्टीत राजसत्ता स्थापन करण्याचा चंग या विचारधारेचे स्वागत करणार्‍यांनी बांधल्याचे जाणवते, जे फारच घातक असून कालचक्राचे काटे उलटे फिरवण्याचा तो प्रकार आहे. ‘बाटका अधिक कडवा असतो’ अशी अवस्था सध्या या धार्मिक निर्बुध्द गुलामांची असून वरील कोणत्याही घटनेचे आपल्याला सोयरसुतक नसल्याची जी भावना समाज दाखवत आहे ते चिंताजनक आहे. 

वेशभूषा आणि केशभूषा बदलून बुद्धत्व प्राप्त करण्याचे प्रयत्न सध्या काहीजणांकडून होत आहेत. काहीजण दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोर  तर कोणी वेशभूषा बदलून सरदार पटेल व्हायचा प्रयत्न करत आहेत. सध्या देशात अशाच निर्बुद्धांचे लोण आले असून कोणी गटारातून  निर्माण होणार्‍या गॅस मधून चहा बनविण्याच्या गमजा मारत आहे तर कोणी ढगाळलेल्या वातावरणात विमाने दिसणार नाहीत समजून लढाई करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. काही निर्बुद्ध तर गाईचे शेण अंगावर फासल्याने किरणोत्साराचा परिणाम होणार नसल्याची ग्वाही देत आहेत. कहर म्हणजे अशा काही कलीयुगीन निर्बुद्ध आर्यभट्टांकडून गणिताची सूत्रेही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही निर्बुद्ध तर त्यांच्या शेतातील आंबा खाल्ला तर मुलगा होण्याची ग्वाही देत आहेत. हे सर्व आपल्या समोर घडत असताना आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही उलट अशा निर्बुद्धांच्या वर्तुणूकीचे समर्थन करतो यावरुन आपणही निर्बुद्धांच्या वाटेवर मार्गक्रमण तर करत नाही ना अशी शंका येते. समाज अशा निर्बुद्धतेकडे कसा वळतो किंवा कसा वळवला जातो याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. चुकीच्या चालीरीती त्यागून समाजाने विज्ञानाचा स्वीकार करावा यासाठी बुद्धत्व प्राप्त केलेले बुद्धीवंत समाजात निरंतन प्रयत्न करत असतानाही समाज पुन्हा असल्या निर्बुद्धतेकडे कसा वळतो हे न उलगडणारे कोडे आहे. 

आज देशात अनेक प्रश्‍न उभे असून समाज म्हणून आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरून आपली बुध्दता आणि निर्बुद्धता ठरते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आ वासून उभा आहे, त्यातच देशाचा आर्थिक विकासाचा दर उणे 7.7 राहणार असल्याचे सांख्यिकी विभागाने सांगितल्याने तो प्रश्‍न अधिक गंभीर झाला आहे. नोटबंदी आणि जिएसटी कराच्या चुकीच्या अंमलबजावणीने व्यापारीवर्गात प्रचंड असंतोष आहे. गेले 50 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून असून देशाचे लाखभर कोटींचे नुकसान त्यामुळे झालेले आहे. 

सध्या देशात कमालीची असहिष्णुता, धर्माधर्मातील तिरस्कार आणि आंधळी भक्ती वाढली आहे. त्याचा धागा पकडून गिरीशजींनी या तथाकथित निर्बुुद्धांचा बुरखा टराटरा फाडला. समाजातील जातीयतेची वृक्षवल्ली संपण्यासाठी, खर्‍या माणुसकीच्या धर्माची प्रतिष्ठापना होण्यासाठी ज्ञानेश्‍वरांपासून अगदी संत तुकडोजी महाराजांपर्यंत थोरामोठ्यांनी केलेल्या शेकडो वर्षाच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसते काय अशी भीती वाटू लागली आहे. पुन्हा एकदा लोकांना धर्माच्या नशेची गोळी राजसत्ता पाजू लागल्याने इतर धर्माची निंदा नालस्ती, परधर्मीयांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करणे यामध्ये हा नवीन निर्बुद्ध वर्ग आनंद मानू लागल्याचे सध्या दिसत आहे. एखाद्या क्षुल्लक व थिल्लर बाबीला कोणत्या तरी कथित परंपरेची झूल चढवून प्रथेच्या रूपात तिचे सादरीकरण करण्याचा सवंगपणा आता उदंड बोकाळतो आहे. त्यामुळे धार्मिक निर्बुद्ध असतो या वाक्याला अधिष्ठापना मिळते. या सगळ्याला ‘भक्ती’ हे नाव देता येईल का?... खरा प्रश्‍न हा आहे. तो प्रत्येकानेच स्वत:ला विचारायला हवा. मात्र, या ‘कथित’ भक्तीच्या प्रांतातील भक्तांचा उन्माद इतका भयंकर आहे की, असे प्रश्‍न विचारण्याचीही भीती वाटावी! खरोखरच हे सगळे एका पातळीवर चिंताजनक नाही का? ‘लोकाभिमुखता’ आणि ‘लोकानुनय’ यांतील सूक्ष्म फरक डोळ्यांआड केलेले राजकीय धुरीणही धर्मसत्तेचा वरचष्मा चालवून घेतात; कारण लोकतंत्रात्मक व्यवस्थेतील संख्याबळाच्या तत्त्वांची सांगड सध्याच्या धर्मकारणाशी आणि त्यातून निर्माण होणार्‍या धर्मसत्तेशी बेमालूमपणे पडलेली दिसते.

आजचे आपल्या पुढ्यातील सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते हेच. विवेकाची जोपासना आपल्या समाजात करणे, हे दिवसेंदिवस मोठे दुर्धर बनते आहे. अविवेकाची काजळी दूर करून विवेकाचा दीप उजळण्याचा वसा संतांच्या परंपरेने महाराष्ट्रात जपला-रुजवला आणि जोपासला. संतविचार आणि पर्यायाने अध्यात्मविचार हा मूलत: विवेकविचार आहे, हे भान आज राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरिणांमध्येही अभावानेच दिसते. चिंतेची खरी बाब आहे ती हीच. विवेक हे तर परिवर्तनाच्या प्रक्रियेचे मुख्य साधन. त्याचाच अभाव असल्यामुळे भक्तीला अपेक्षित असलेले नीतीचे अस्तरही हरपलेले दिसते. विवेक हे बुद्धत्वाचे अनिवार्य अंग असल्यामुळे ते परिवर्तनाच्या चळवळीचे एक साधनच ठरावे. मात्र, सध्या विवेकाचीच कास सुटल्याने आपल्या समाजात ‘चळवळ आहे, पण परिवर्तन नाही’, असे दारुण वास्तव सर्वत्र अनुभवायला मिळते. त्यामुळे धर्माची पट्टी डोळ्यावर बांधून निर्बुद्धत्वाकडे जाण्यापेक्षा बुद्धत्वाचा मार्ग कधीही चांगला कारण तोच अविनाशी आणि चिरंतन असतो. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट