मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

01 जानेवारीपासून स्थानिकांना टोलमध्ये सूट

धडक मोर्चामुळे टोलनाका प्रशासन नरमले 

पनवेल ः पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून सोमवारी(दि.28) धडक मोर्चा काढण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामुळे आयआरबी टोलनाका प्रशासन नरमले असून 01 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.  

स्थानिकांनी वारंवार मागणी करुनही त्याची दखल टोल प्रशासनाद्वारे घेतली जात नव्हती. अखेर त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाची तीव्रता पाहून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता. या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान आयआरबी टोलनाका प्रशासनाकडून चर्चेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना आमंत्रित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत टोल नाक्यावरून रोहींजण परिसरातील स्थानिक चालक मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची माल वाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करीत होती. परंतु सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारले जात असल्याने त्यांना टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही नमूद केले. यावेळी प्रशासनाने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या वाहनांना 01 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सूट देण्याचे मान्य केले. तसेच यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी या टोलनाक्यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना किमान वेतन 15 हजार रुपये पगार द्यावा, अशी मागणी यावेळी केली आहे. 

या महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्याने साहजिकच स्थानिकांना याच मार्गावरून वाहतूक करावे लागते. येत्या काळात या मार्गाचे रुंदीकरण होऊन सर्व्हीस रोड मिळेल पण तो पर्यंत याच मार्गाचा उपयोग केला जाणार त्यामुळे स्थानिकांच्या वाहतूक वाहनांना सूट प्राधान्याने मिळाली पाहिजे. आयआरबी अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेत टोल सूटचा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यानुसार स्थानिकांच्या माल वाहतूक वाहनांना सूट मिळणार आहे. मात्र प्रशासनाने माघार घेतल्यास तीव्र आंदोलन करू. या टोल नाक्यावरील कमर्चार्‍यांना किमान वेतन लागू करावा हि मागणी केली आहे. आरबीआय या बाबतीत सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. 
-आमदार प्रशांत ठाकूर

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट