मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

टी 55 रणगाड्याचे शानदार लोकार्पण

अलिबाग ः भारतीय लष्करामध्ये भीमपराक्रम करणार्‍या रणगाड्यामुळे अलिबागप्रमाणेच रायगडची देखील शान वाढेल, असा विश्‍वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय लष्करातील पराक्रमाची यशोगाथा सांगणार्‍या टी 55 या भव्य रणगाड्याचे आ. जयंत पाटील यांच्या हस्ते शानदार लोकार्पण करण्यात आलेे. युवावर्गाला लष्करात भरती होण्यास प्रोत्साहन ठरणार्‍या या रणगाड्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी अलिबागकरांसह ठिकठिकाणाहून नागरिक तसेच पर्यटकांनी हजेरी लावली होती. नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि टिम अत्यंत दिमाखदार तेवढाच शिस्तबद्ध कार्यक्रम घडवून कौतुकास पुन्हा एकदा पात्र ठरली.

सुरुवातीला आ. जयंत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते रणगाडयाच्या कोनशिला आणि लोकार्पण करण्यात आले. तर रणगाडयाची माहिती फलकाचे अनावरण पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड पोलिस बँड पथकाच्या देशभक्तीपर सुरेल गितवादनाने वातावरण भारुन गेले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग शहराचा चौफेर विकास करण्यात आला आहे. फक्त ड्रेनेजचे काम शिल्लक आहे. वाढीव एफएसआयमुळे शहराच्या विकासातदेखील वाढ होत आहे. पर्यटन दृष्टया जास्तीत जास्त विकास काम होत असून नगरपरिषदेच टिम चांगले काम करीत आहे. विकासाची उंची वाढवून ती कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात रायगडकरांच्या जिव्हाळ्याबद्दल आभार मानले. आजचा चांगला दिवस निवडल्याचे सांगतानाच येणारे पर्यटक एक चांगली आठवण घेऊन परततील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नाताळ आणि शासक दिवसाच्या शुभेच्छा देतानाच आजपासून लागू होणार्‍या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मावळ्यांचा जिल्हा असणार्‍या रायगडमधील तरुण सैन्यात कमी संख्येने प्रवेश घेत असल्याबद्दल खंत व्यक्त करतानाच हा रणगाडा प्रेरणा देऊन लष्करभरतीला प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. तर कॅप्टन (निवृत्त) उमेश वाणी यांनी रणगाडयाविषयी माहिती देताना त्याची विजयगाथा अलिबागकरांसमोर उभी केली.

या कार्यक्रमात नुकतीच बदली झालेले अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या विशेष कामगिरीबद्दल आ. जयंत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष प्रशांत नाईक व उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे यांनी केले. सुत्रसंचलन, प्रस्तावना तसेच आभारप्रदर्शन गटनेते प्रदीप नाईक यांनी केले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट